Maharashtra Politics : दिल्लीत पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेची चर्चा जगभरात होत आहे. चाळीसहून अधिक राष्ट्राच्या अध्यक्षांची परिषदेला हजेरी आणि या बैठकीतून झालेल्या निर्णयामुळे जगभरात भारताच्या सामर्थ्याची चर्चा होत आहे. (Shivsena Political News) त्याही पेक्षा आणखी एका गोष्टीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकाणात होतांना दिसते आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जी-२० परिषदेच्या समारोपासाठी राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्यावतीने आयोजित मेजवाणीला हजेरी लावली. याच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे समोरासमोर आले. या भेटीच्या छायाचित्राची सगळीकडे चर्चा होतांना दिसते आहे. त्याहीपेक्षा जास्त चर्चा होतेयं ती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या फोटोवर केलेल्या टिप्पणीची.
एक विद्यमान मुख्यमंत्री जे सर्वात लोकप्रिय असल्याचा दावा करतात, तर दुसरे माजी मुख्यमंत्री जे कोरोना काळात केलेल्या कामामुळे जगात प्रसिद्ध असल्याचे म्हटले जाते. (Maharashtra) तर या माजी मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्यासोबतच्या फोटोची खिल्ली उडवली आहे.
जळगाव येथील एका कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी ठाकरे यांच्या या फोटोचा संदर्भ देत `ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो तर काढला, पण त्यांच्याशी काय बोललातं ? कोणत्या भाषेत बोलला, काय बोलला तेही कळू द्या. बरं सुनक काय बोलले ते तुम्हाल कळलं का? की नुसतं चमकोगिरी करण्यासाठी फोटो काढला`, अशा शब्दात शिंदेंची खिल्ली उडवली.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली होती. सत्ता तर गेली, पण शिंदेंमुळे शिवसेना नाव, पक्ष आणि चिन्हही हातचे गेले. त्यामुळे ठाकरे यांचा त्यांच्यावर राग असणे सहाजिक आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूका पाहता ठाकरे यांनी शिंदे यांना निशाणा केल्याचे त्यांच्या अलीकडच्या भाषणातून दिसून आले आहे.
हिंगोली येथे गेल्या महिन्यात झालेल्या निर्धार सभेत एक मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्र्यांची ठाकरे यांनी अशीच खिल्ली उडवली होती. `एक फूल दोन हाफ`, असा उल्लेख ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार यांचा केला होता. त्यानंतर आज संधी मिळताच ठाकरे यांनी जळगावमधून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्ला चढवला.
मणिपूरचा उल्लेख करत तिथे काय चाललं आहे याच्या बातम्या येत नाहीत, तिथे अजूनही महिलांवर अत्याचार सुरू आहेत. पंतप्रधान मात्र जी-२० मध्ये लगबग करत आहेत. मुख्यमंत्रीही दिल्लीला गेले, एकतर ते बेकायदा मुख्यमंत्रीआहेत. जी -२० परिषदेत जाऊन बायडेनशी बोलणार का? असा चिमटाही ठाकरे यांनी काढला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.