Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी 26 आरोपींविरोधात गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Baba Siddique murder case : या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसे दररोज नवीन खुलासे होत आहेत. हत्येप्रकरणी त्या 26 आरोपींविरोधात मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई.
Baba Siddique Murder Case Update
Baba Siddique Murder Case UpdateSarkarnama
Published on
Updated on

Baba Siddique Murder Case Update : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसे दररोज नवीन खुलासे होत आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखाने आरोपपत्र तयार केले आहे.

आठवड्याच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत आहेत. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या 2.5 महिन्यांनंतर, लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने बाबा सिद्दिकीची (Baba Siddique) हत्या केल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत.

Baba Siddique Murder Case Update
Santosh Deshmukh Murder : बीडमध्ये जे काही घडलंय, त्याला धनंजय मुंडेंची कार्यपद्धती जबाबदार; स्वपक्षातील नेत्याने साधला निशाणा

गुन्हे शाखेच्या तपासात कोणताही दुवा सापडला नाही. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या 26 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करू शकतात. यात तीन सूत्रधार आणि एक मुख्य सूत्रधार- शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ अनमोल बिश्नोई अशी तीन आरोपींना फरार घोषित करण्यात येणार आहे.

हत्येमागील मूळ कारण अजूनही अस्पष्ट

या हत्येमागील कारण म्हणजे मुंबई गुन्हे शाखेला (Crime Branch) अद्याप काहीही ठोस सापडले नसल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. मात्र मुंबई क्राईम ब्रँचने एसआरए वादाच्या ही हत्या झाली आहे का? पोलिसांना एसआरए प्रकल्पामुळे ही हत्या झाली असल्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नसल्याचेही बोलले जात आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्यातील जवळीकता यातूनच ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. हे कारण देखील त्यांच्या हत्येमागे असू शकते.

Baba Siddique Murder Case Update
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजेंचा सरकारला संतप्त सवाल; 'वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही?'

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखा (Crime Branch ) या आठवड्याच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. SRA (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) वाद हा संभाव्य हेतू म्हणून सुचविणारा कोणताही पुरावा नसल्याचे सूत्रांनी उघड केले आहे. त्याऐवजी, भक्कम पुराव्याच्या आधारे, तपासकर्त्यांचा असा विश्वास आहे की सिद्दीकीचा सलमान खानशी जवळचा संबंध या हत्येमागील हेतू होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com