Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजेंचा सरकारला संतप्त सवाल; 'वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही?'

Sambhajiraje Chhatrapati on Santosh Deshmukh Murder Case : कराडांना अद्याप अटक होत नसल्याने वातावरण तापले आहे. हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
Sambhajiraje Chhatrapati  on Sarpanch Murder Case
Sambhajiraje Chhatrapati Sarkarnama
Published on
Updated on

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये (Beed) सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचे नाव घेण्यात येत आहे.

कराडांना अद्याप अटक होत नसल्याने वातावरण तापले आहे. हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चा निघणार असून मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

वाल्मिक कराडला अद्याप अटक का केली नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. वाल्मिक कराडला संरक्षण देणारे मंत्री यांनी राजीनामा का दिला नाही. धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराडशिवाय पान हलत नाही हे पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या होत्या. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

Sambhajiraje Chhatrapati  on Sarpanch Murder Case
Walmik Karad Wife Investigation : बीडमधून मोठी अपडेट! फरार वाल्मिक कराडचा फास आवळला, सीआयडीकडून पत्नीची कसून चौकशी

'अत्यंत दुर्दैव आहे. आज 19 दिवस झाले, वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आहेत. मुख्यमंत्र्‍यांनी त्याच्यावर मोक्का लावतो असे म्हटले आहे. पुढे काय तो बिनधास्त फिरत आहे. इन्स्टाग्रामवर फोटो टाकत आहे. तरी आपण काही करू शकत नाही. अजित पवार इतक्या प्रखरपणे बोलतात, प्रखरपणे मते मागतात. मग हे वाल्मिक कराड जे काही चालले आहे, हे तुम्ही कसे खपवून घेता,' असा सवाल संतप्त सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांना केला आहे.

'मुख्यमंत्र्यांवर इतक्या बहुसंख्य लोकांनी विश्वास ठेवलाय. आता खरी वेळी आलीये की, तुमच्यात जे काय कौशल्य असेल ते वापरून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आरोपींना शोधून काढयचे म्हटलं तर 2 मिनटं लागतात.

Sambhajiraje Chhatrapati  on Sarpanch Murder Case
Anjali Damania : वाल्मिक कराडच्या मुलाच्या कमरेला बंदूक, अंजली दमानियांनी दाखवले फोटो

कराडच्या संपर्कात कोण आहे, त्याचे खास संबंध कुणाशी आहेत? धनंजय मुंडे यांच्याशी आहे. ते स्वतः म्हणतात वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहे. धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला शोधून आणावं, मंत्रीपदाची जबाबदारी कशाला घेतली. सरकारमध्ये बसून या गोष्टी तु्म्ही चालवताय. त्यांना संरक्षण देताय. वाल्मिक कराडला पकडल्यानंतर अनेक समोर येईल.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com