MLA Baburao Kadam Reaction : आमदार कदमांचा मंत्री सावेंना 'करारा जवाब',महायुतीची सत्ता अन् 237 आमदारही एकनाथ शिंदेमुळेच!

MLA Baburao Kadam reacts strongly to Save’s statement, claiming that Mahayuti's rule and the election of 237 MLAs were only possible due to Eknath Shinde's leadership. : जे 237 आमदार निवडून आल्याचे सावे सांगत आहेत, तेही शिदे यांच्यामुळेच. अतुल सावे यांना याचा विसर पडला आहे का? असा सवालही कदम यांनी केला.
Atul Save-Baburao Kadam controversy News
Atul Save-Baburao Kadam controversy NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अतुल सावे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी शिवसेनेचे हदगावचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी तांडा वस्ती सुधार योजनेचा निधी मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पालकमंत्री सावे यांना पत्र पाठवले होते. तसेच सावे नांदेड दौऱ्यावर आले की आपण आंदोलन करणार असल्याचे पत्रात नमूद केले होते. यावर नाराज झालेल्या अतुल सावे यांनी आमच्याकडे 237 आमदार आहेत, ज्यांना जायचे त्यांनी जावं, आणि ज्यांना राहायचंय त्यांनी राहावं, असे म्हणत संताप व्यक्त केला होता.

सावे यांचे हे विधान शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले. हदगाव-हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी आज अतुल सावे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश मिळाले आहे, ते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या चेहऱ्यामुळे. जे 237 आमदार निवडून आल्याचे सावे सांगत आहेत, तेही शिदे यांच्यामुळेच. अतुल सावे यांना याचा विसर पडला आहे का? असा सवालही कदम यांनी केला.

महायुतीत कोणी राहायचे आणि कोणी जायचे याचा अधिकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांना नेमका कोणी दिला? विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला 237 जागा मिळाल्या, याच आत्मपरिक्षण मंत्री अतुल सावे यांनी केले पाहिजे. हे सगळं यश कोणत्या चेहऱ्यामुळं मिळालं. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर करुन विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाले, असा दावा बाबुराव कदम यांनी केला.

Atul Save-Baburao Kadam controversy News
Atul Save-Sanjay Shirsat News : कार्यक्रमाला पालकमंत्री शिरसाट दीड तास लेट, सावे म्हणाले, खैरेंसारखे वागू नका!

मी आमदार म्हणून जरी नवखा असलो तरी पंचवीस वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये काम करतोय. 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य, चेअरमन होतो. ग्रामपंचायतचा सरपंच पदापासून मी राजकारणाला सुरुवात केली आहे. तांडा वस्तीचा प्रस्ताव कसा सादर करायचा? हे सांगण्याइतपत मी छोटा नाही. गेल्या वेळी मंत्री असताना अतुल सावेंनी माझ्या अनेक प्रस्तावांना मुंजरी दिली नव्हती, असा आरोपही आमदार कदम यांनी केला. आताही माझ्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली नाही. महायुतीचे नांदडे जिल्ह्यात 9 आमदार आहेत. यापैकी 7 आमदारांनी त्यांच्या विरोधात तक्रारी करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही कदम यांनी सांगितले.

Atul Save-Baburao Kadam controversy News
Nanded Political News : नांदेडमध्ये महायुतीमध्ये इनकमिंग जोरात, तर महाविकास आघाडीत शांतता!

बाबुराव को गुस्सा क्यो आया..

तांडा वस्तीचा निधी मिळावा यासाठी अनेकदा पत्रव्यवहार करुनही अतुल सावे यांनी तो दिला नाही. हा निधी विरोधी पक्षांच्या नेत्यांना दिल्याचा आमदार बाबुराव कदम यांचा आरोप आहे. अतुल सावे जिल्ह्यात दौऱ्यावर येतील तेव्हा विरोध करुन आंदोलन करेन, असा इशारा शिंदे कदम यांनी दिला होता. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी तांडा वस्ती सुधार योजनेच्या निधी वाटपात अनियमितता केल्याची त्यांची तक्रार होती.

Atul Save-Baburao Kadam controversy News
Shivsena UBT MNS Alliance : राज-उद्धव युतीची चर्चा सातासमुद्रापार? दोन्ही बंधू एकाच वेळी परदेशात गेल्याने चर्चांना उधाण

काल आढावा बैठकीत जेव्हा हा विषय आला तेव्हा तांडा वस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत येतात, त्याला फक्त मी मंजूरी दिली. तक्रार करणाऱ्या आमदारांना प्रक्रिया माहीत नाही. त्यांनी अभ्यास करावा, असा सल्ला सावे यांनी दिला होता. आमच्याकडे 237 आमदार आहेत, ज्यांना महायुतीत राहायच त्यांनी रहावं आणि ज्यांना नको त्यांनी बाहेर पडावं, असं अतुल सावे म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com