Bacchu Kadu: आमदारकी गेली आता बँकेचे संचालकपदही जाणार ? 18 तारखेच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष

Amravati Zilla Cooperative Bank President Bacchu Kadu Notice: बबलू देशमुख गटातील संचालक हरीभाऊ मोहोड व अन्य 11 संचालकांनी कडू यांना हटविण्यासाठी याचिका दाखल केली आहे.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय, मंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेले, प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आक्रमक माजी आमदार बच्चू कडू यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. त्यांच्या मागील शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नसल्याची सध्याची परिस्थिती आहे. 18 मार्चच्या सुनावणीकडे राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. आमदारकी गेल्यानंतर त्यांना आता सहकारक्षेत्रातील महत्वाचे पदही जाणार का, अशी चर्चा होत आहे.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष, माजी आमदार बच्चू कडू यांची बँकेच्या संचालक पदावरुन हटवण्यासाठी विभागीय सहनिंबधकांनी त्यांना 7 फेब्रुवारी रोजी नोटीस बजावली होती. त्यावर त्यांना24 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहून म्हणणे मांडण्याची संधी सहनिंबधकांनी त्यांना दिली होती.

कडू यांनी 10 मार्चपर्यंत मुदत मागितली होती, ही मुदत मंजूर करण्यात आली होती. पण आणखी वेळ वाढवून हवा, यासाठी बच्चू कडू यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. बच्चू कडू यांच्या अर्जाची दखल घेत कोर्टाने त्यांना आणखी आठ दिवस वाढवून दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाची 18 मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

Bacchu Kadu
BJP MLA: परिणय फुकेंनी फोडला 'एजंट बॉम्ब'; फडणवीसांना दिलेल्या ऑडिओ क्लिपमधील नेता कोण?

काय आहे प्रकरण

बच्चू कडू यांचे बँकेचे संचालक पदावरुन गटविण्यासाठी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. बबलू देशमुख गटातील संचालक हरीभाऊ मोहोड व अन्य 11 संचालकांनी कडू यांना हटविण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

बँकेच्या नियमानुसार एका वर्षापेक्षा अधिक काळ शिक्षा झालेल्या व्यक्तीला संचालक पदासाठी अपात्र ठरवलं जाते. याचा आधार घेऊन बच्चू कडू यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयाचा एका प्रकरणाचा दाखला याचिकाकर्त्यांनी दिला आहे.

बच्चू कडूंना कोणत्या प्रकरणात शिक्षा

नाशिकच्या सरकारवाडी पोलिस ठाण्यात बच्चू कडू यांच्यावर 2017 मध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि आणि मारहाण केल्याच्या गुन्ह्यात विशेष न्यायालयाने एक वर्षांपर्यंत कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेला बच्चू कडूंनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. याच प्रकरणाचा दाखला देत अमरावती जिल्हा सहकारी बँकेतील विरोधी गटातील संचालकांनी बच्चू कडू यांच्याविरोधात याचिका दाखल करत संचालक पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com