Bachchu Kadu On Devendra Fadnavis : पंकजाताईंसाठी फडणवीसांच्या कार्यवाहीचं नवल नाही; बच्चू कडू असं का म्हणाले...

Bachchu Kadu, Devendra Fadnavis And Pankaja Munde Politics : भाजपमधील ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेण्याचे संकेत मिळत आहेत. नेते देवेंद्र फडणवीस यासाठी कार्यवाही करत असल्यास त्यात नवल काय, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
Bachchu Kadu On Devendra Fadnavis
Bachchu Kadu On Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu And Pankaja Munde Politics : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पक्षात पुर्नवसनासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यसभेवर त्यांची वर्णी लागणार असे वृत्त समोर येत आहेत. पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुर्नवसनावर देवेंद्र फडणवीस करत असलेल्या कार्यवाहीवर प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

"देवेंद्र फडणवीस यांची ही कार्यवाही म्हणजे, विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष सावरला गेला पाहिजे, अशी ही कार्यवाही असणार आहे", असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांचे राजकीय करिअरला ब्रेक बसला आहे. पंकजा मुंडे यांचा राजकीय संघर्ष संपेल, असे लोकसभा निवडणुकीत वाटत होते. परंतु बीड लोकसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. या पराभवामागे अनेक कारणं सांगितले जात आहे. परंतु पंकजा यांच्या पराभवानंतर त्यांच्या समाजातील तरुणांनी वेगळचं टोकाचं पाऊल उचलण्यास सुरवात केली.

राज्यात मराठा आंदोलनानंतर ओबीसी नेत्यांनी आरक्षण वाचवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीत पक्षाचा मोठी वाताहात झाली. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. भाजपला निवडणुकीपूर्वी सावरायचे आहे. त्यामुळे पक्षाची बांधणी केली जात असून, यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे राजकीय पुर्नवसन होणार असल्याचे समोर येत आहे. त्यांना राज्यसभेवर संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Bachchu Kadu On Devendra Fadnavis
Eknath Khadse : खडसेंनी शाह भेटींचं गुपित सांगितलं; भाजप प्रवेशावर मोठं विधान

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचे वृत्त आहे. यावर बच्च कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे समाजात मोठ्या प्रमाणात काम आहे. मुंडेसाहेब विरोधी पक्ष नेते होते तेव्हा, त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्याचं योगदान भाजपमध्ये मोठा आहे. त्यामुळे भाजपकडून पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन होत असेल, यात काही नवल नाही. पक्ष सावरला गेला पाहिजे हा प्रत्येकाचा हेतू असतो. त्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कार्यवाही असेल", असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Bachchu Kadu On Devendra Fadnavis
Pankaja Munde and Rajyasabha : पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी लागण्याची चिन्हं; फडणवीसांची अमित शाहांशी झाली चर्चा?

राज्यसभेवर असलेले पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीत विजय झाला आहे. त्यामुळे त्यांच्या जागारिक्त झाल्या आहेत. यातील एका जागेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. दिल्ली येथील भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या बैठकीत तशी चर्चा झाली असून, संकेत मिळत आहेत. हा निर्णय झाल्यास पंकजांसह त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा संघर्ष थांबताना दिसत नाही. यातच पंकजा मुंडे यांनी ओबीसी आंदोलकांची भेट घेऊन आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. भाजपमधील ओबीसी नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेतल्यास यातून राज्य सरकारला थोडासा दिलासा मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com