Eknath Khadse : खडसेंनी शाह भेटींचं गुपित सांगितलं; भाजप प्रवेशावर मोठं विधान

Eknath Khadse Met Amit Shah : भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सून केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंसह भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी भाजपमधील प्रवेशावर मोठं विधान केलं आहे.
Eknath Khadse Met Amit Shah
Eknath Khadse Met Amit Shah Sarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse And Amit Shah : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासह भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांची ही भेट म्हणजे, माझा भाजपमध्ये अनौपचारीक प्रवेश झाला आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी 'साम टीव्ही'शी बोलताना दिली.

नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्याबद्दल एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या. एकनाथ खडसे यांची सून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या देखील यावेळी उपस्थित होत्या.

भाजपचे (BJP) दिग्गज नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी घेतली. एकनाथ खडसे यांनी सुरवातीला ही भेट सदिच्छा असल्याचे म्हटले. परंतु पंधरा तासानंतर ही भेट म्हणजे माझा भाजपमधील अनौपचारीक प्रवेश असल्याचे म्हटले आहे. अमित शाह ही भेट म्हणजे एकनाथ खडसे यांचा भाजपमधील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसे यांची शाह यांच्याशी झालेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Eknath Khadse Met Amit Shah
Pankaja Munde and Rajyasabha : पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी लागण्याची चिन्हं; फडणवीसांची अमित शाहांशी झाली चर्चा?

एकनाथ खडसे (Eknath Khadse) तसे भाजपचे जुने सहकारी आहे. पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे नाराज होऊन ते शरद पवार यांच्या संपर्कात गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ते शरद पवार यांच्याबरोबर थांबले. परंतु लोकसभा निडवणुकीत त्यांनी शरद पवारांपासून लांब जात वेगळी भूमिका घेतली. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. तशी लोकसभा निडवणुकीदरम्यान या दोघा नेत्यांची भेट देखील झाली होती. यातच आता त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Eknath Khadse Met Amit Shah
Laxman Hake And Government Delegation : मोठी घडामोड; लक्ष्मण हाके उपोषणावर ठाम, आंदोलनस्थळी गोंधळ आणि घोषणाबाजी

अमित शाह यांची भेट घेतली त्यावेळी एकनाथ खडसे यांच्याबरोबर त्यांची सून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे होती. रक्षा खडसे यांनी भाजपकडून निवडणूक लढवत केंद्रात मंत्रिपदावर विराजमान झाल्या. मंत्रिपदाची शपथ घेऊन रक्षा खडसे रावेर (जळगाव) मध्ये आल्यानंतर त्यांनी खडसे घराण्याचा राजकीय वारसा आपण चालवणार असल्याचे म्हटले होते. यानंतर सासरे खडसे यांना घेऊन त्यांनी शाह यांची भेट घेतल्याने त्यांनी त्यांच्या राजकीय वाटचाली चुणूक दाखवली.

एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांनी पक्षासाठी महाराष्ट्रात मोठे योगदान दिले. खादेशात त्यांनी भाजप वाढवली. एकनाथ खडसे यांनी 40 वर्षांपासून विविध पदांवर भाजपचे नेतृत्व केले. परंतु पक्षांतर्गत कुरघोड्यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. शरद पवार यांची साथ केली होती. एकनाथ खडसे आता तरी भाजपकडे जात असले तरी, ते शरद पवार यांनी दिलेली साथ लक्षात ठेवून आहेत. आता एकनाथ खडसे भाजपमध्ये आल्यास पुन्हा भाजपची ताकद वाढणार आहे. एकनाथ खडसे यांना संधी मिळाल्यास ते नवीन-जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालतील, असे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com