Rohit Pawar : परळी खून प्रकरणात रोहित पवारांचा गंभीर आरोप, 'धनंजय मुंडेंचे...'

Beed Parli Firing : आर्थिक देवाणघेवाणीतून बबन गित्ते यांनी सरपंच आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याचे 'एफआयआर'मध्ये नमूद आहे. मात्र, या प्रकरणात रोहित पवारांनी धनंजय मुडेंवर निशाणा साधला आहे.
Rohit Pawar Dhananjay Munde
Rohit Pawar Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : परळी शहरात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. तर, ग्यानबा उर्फ गोट्या गित्ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

'परळीत धनंजय मुंडे यांचे खुप काही चालतं असं नाही. कारण त्यांचा राईट आणि लेफ्ट हँड परळी चालवतात. त्यांच्या वतीने काही करण्यात आलं आहे का? हे पाहिले पाहिजे. आमच्या बबन गित्ते यांनी परळीत बोगस मतदान झालं हे समोर आणल होतं. त्याचा हा राग असावा, असे रोहित पवार म्हणाले आहेत .

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होतोय की त्यांचा राईट अँड लेफ्ट हँड हे काल दिवसभर आंदोलनात देखील पाहण्यास मिळाले. त्यामुळे माझी मागणी आहे की त्यांची देखील चौकशी व्हायला हवी, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

आर्थिक देवाणघेवाणीतून बबन गित्ते यांनी सरपंच आंधळे यांच्यावर गोळीबार केल्याचे 'एफआयआर'मध्ये नमूद आहे. या प्रकरणात पोलिसांनी शशिकांत बबन गित्ते, मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, महादेव उद्धव गित्ते, राजाभाऊ संजीवन नेहरकर, राजेश अशोक वाघमोडे, यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Rohit Pawar Dhananjay Munde
Gautam Kakade: बारामतीतील निंबाळकर खून प्रकरणी फरार आरोपी गौतम काकडे याला अटक

सरकार घाबरलं आहे

विधिमंडळातील अर्थसंकल्प मांडतानाचे अजित पवार Ajit Pawar यांचे भाषणं ऐकलं तर कुठं तरी सरकार घाबरलं आहे, असं लक्ष्यात येत आहे. अजित पवार यांनी आपल्या मतदारसंघाचा उल्लेख केला.

जानाई, शिरसाई आणि पुरंदर उपसा प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केल्याच पाहिला मिळालं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी यामधे लक्ष घातलं होतं. अजितदादा घाबरले आहेत, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

Rohit Pawar Dhananjay Munde
Nashik Teacher Constituency Result 2024 : नाशिक शिक्षक निवडणुकीत ठाकरे अन् शिंदे गटामधील चुरशीचा फायदा कोणाला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com