Suresh Dhas News : ‘खोक्या’च्या अटकेनंतर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अत्यंत चांगली...

बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने खोक्याला अटक केली आहे. त्याला एक-दोन दिवसांत बीडमध्ये आणले जाणार आहे.
Satish Bhosale-Suresh Dhas
Satish Bhosale-Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचे आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले म्हणजे खोक्याला बुधवारी बीड पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली. त्यांचे मारहाण तसेच धमकी, पैसे उडवण्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सुरेश धस यांच्यावर टीका सुरू होती. आता पोलिसांनी खोक्याला अटक केल्यानंतर धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने खोक्याला अटक केली आहे. त्याला एक-दोन दिवसांत बीडमध्ये आणले जाणार आहे. त्यानंतर धस यांनी मीडियाशी बोलताना ही अत्यंत चांगली बाब असल्याचे त्यांनी सांगितले. आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. त्याने जी चूक केली असेल त्यानुसार त्याच्यावर कारवाई करा, असे मी म्हणत होतो. त्याच्यावर जी कलमे लागली आहेत, त्यानुसार कारवाई होईल, असेही ते म्हणाले.

Satish Bhosale-Suresh Dhas
Beed News : अखेर सुरेश धसांचा गुंड कार्यकर्ता 'खोक्या'च्या मुसक्या आवळल्या; पोलिसांनी थेट प्रयागराजमधून उचललं

खोक्याला अटक होऊ नये, यासाठी धस यांच्याकडून फोनाफोनी झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. हे आरोप धस यांनी फेटाळून लावले. अजिबात नाही. मी कुणाला फोन करत नाही, असे धस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मंगळवारी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत धस यांच्यावर निशाणा साधला होता.

धस यांनी मुंडे यांना प्रत्युत्तर देताना अजय मुंडे फार लहान आहे, असा टोला लगावला. माझे धनंजय मुंडेना आव्हान आहे, याला-त्याला बोलायला लावू नये, त्यांनी बोलावे मग मी त्यावर बोलेन, असेही धस यांनी स्पष्ट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरण आपण यापुढेही तेवत ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Satish Bhosale-Suresh Dhas
Shivaji Chumbhale Politics: दुबईवारी फळाला आली...बाजार समिती सभापतींवरील ‘अविश्वास’ मंजूर!

संतोष देशमुख हा भाजपचा बुथप्रमुख होता. म्हणून मी हे प्रकरण तेवत ठेवले आहे. जोपर्यंत गुन्हेगारांना फाशी होत नाही, तोपर्यंत हे प्रकरण तेवत ठेवणार आहोत, असे धस म्हणाले. खोक्याला अटक बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मार्च किंवा 23 मार्चला त्याला बीडला आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. एका व्यक्तीला बॅटने अमानुषपणे बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com