Suresh Dube Murder Case: महाराष्ट्रातील शेवटच्या टाडा केसमध्ये भाई ठाकूरसह तिघे निर्दोष; बिल्डर दुबे खून प्रकरण!

Bhai Thakur Release from Jail In Builder Suresh Dube Murder Case- महाराष्ट्रातील शेवटची टाडा केस म्हणून खटला चर्चेत.. सहा जणांनी झाली होती जन्मठेप!
Bhai Thakur Acquitted In Builder Suresh Dube : Bhai Thakur
Bhai Thakur Acquitted In Builder Suresh Dube : Bhai ThakurSarkarnama

Nalasopara Crime News : तब्बल चौतीस वर्षांआधी बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा खून घडून आला होता. सुरेश दुबे खूनप्रकरणी भाई ठाकूर, दीपक ठाकूर गजानान पाटील या तिघांचीही टाडा खटल्यामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणावर विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी आज निकाल देत, तिघांची निर्दोष मुक्तता केली. (Latest Marathi News)

Bhai Thakur Acquitted In Builder Suresh Dube : Bhai Thakur
Maharashtra HSC Result 2023 Date : बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; उद्या निकाल जाहीर होणार

चौतीस वर्षांपूर्वी बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा नालासोपारा रेल्वे स्टेशनवर खून झाला होता. या खटल्यात भाई ठाकूर, दीपक ठाकूर यांना अटक करण्यात आली होती. यापूर्वी या प्रकरणात एकूण सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे महाराष्ट्रातलं शेवटचं टाडा प्रकरण होतं.

Bhai Thakur Acquitted In Builder Suresh Dube : Bhai Thakur
Arvind Kejriwal in Mumbai: केजरीवालांची महाराष्ट्रातील विरोधीपक्षांना मागणी; राज्यसभेत 'तो' अध्यादेश मंजूर करु नका

या दुबे खून प्रकरणात विशेष सरकारी वकील सतीश मिश्रा यांनी काम पाहिले. तर बचाव पक्षाचं काम वकील सुदीप पासबोला, तसेच वकील सुधीर शहा, वकील रोहन नहार, वकील प्रीतेश खराडे, वकील सचिन पाटील, वकील रोहित तुळपुळे यांनी काम पाहिले. त्याचप्रमाणे दिवंगत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत शिवदे यांनीसुद्धा या खटल्यात काम केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com