Maharashtra HSC Result Date: बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; उद्या निकाल जाहीर होणार

Maharashtra HSC Result Date Announced: ऑनलाईन पद्धतीन विद्यार्थ्यांना निकाल समजणार
HSC Result
HSC ResultSarkarnama

Maharashtra Board HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाकडे अनेक विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. हा निकाल गुरुवारी (ता. २५) दुपारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाईल. (Marathi latest News)

HSC Result
Arvind Kejriwal in Mumbai: केजरीवालांची महाराष्ट्रातील विरोधीपक्षांना मागणी; राज्यसभेत 'तो' अध्यादेश मंजूर करु नका

विद्यार्थी https://www.mahahsscboard.in mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahresults.org.in या संकेतस्थळावर आपले निकाल पाहू शकतात. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना बारावीचा पर्याय निवडावा लागणार आहे. तेथे आपला हॉल तिकीट क्रमांक आणि इतर माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल समजणार आहे. येथून विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड करु शकणार आहेत. (Maharashtra Board HSC Result 2023)

बारावीची परीक्षा सुमारे १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्या विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतीक्षा होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बोर्डाकडून गुरुवारी सकाळी ११ वाजता विभागवार निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. (HSC Result 2023)

HSC Result
Ashish Deshmukh News : मोठी बातमी! आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी; काय आहे प्रकरण ?

बारावीची परीक्षा ३ हजार १९५ केंद्रावर पार पडली होती. ही परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाने प्रयत्न केले होते. आता गुरुवारी दुपारी दोन वाजता हा निकाल जाहीर होत आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करता येणार आहे. त्यासाठी २६ मे ते ५ जून या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतिसाठी २६ मे ते १४ जून या दरम्यान अर्ज करावा लागणार आहे. (Maharashtra Board 12th class Result)

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com