Bhayyaji Joshi statement : वादग्रस्त वक्तव्यानंतर भय्याजी जोशींचे मोठे विधान; म्हणाले, 'मला मराठी भाषेचा...'

Marathi language controversy news : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वक्त्यावरून भय्याजी जोशी यांच्यावर टीका केली होती. तर दुसरीकडे यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भय्याजी जोशी यांनी मोठे विधान केले आहे.
Bhayyaji joshi
Bhayyaji joshiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईत प्रत्येकाला मराठी भाषा येणे गरजेचे नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला. मुंबई उपनगरातील विद्याविहार परिसरातील कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले होते. भय्याजी जोशी यांच्या या वक्तव्यानंतर गुरुवारी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठा गदारोळ पाहावयास मिळाला. त्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वक्त्यावरून भय्याजी जोशी यांच्यावर टीका केली होती. तर दुसरीकडे यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भय्याजी जोशी यांनी मोठे विधान केले आहे.

मला मराठी भाषेचा अभिमान आहे. माझ्या विधानामुळे गैरसमज झाला आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे. मुंबई व महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे, याबद्दल दुमत नाही. सांस्कृतिक दृष्टीने अभ्यास करावा, अशी आपली भाषा आहे, असे भयाजी जोशी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्टीकरण दिले.

Bhayyaji joshi
Local Self-Government Election : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 'तारीख पे तारीख'; इच्छुकांची घालमेल काही केल्या संपेना !

दरम्यान, महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेना आमदारांनी या मुद्द्यावरुन सरकारला प्रश्न केले. त्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. भैय्याजी जोशी हा माणूस चिल्लर आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं किंवा भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

Bhayyaji joshi
Uddhav Thackeray Video: 'हा संघाचा छुपा अजेंडा, अनाजी पंत...', उद्धव ठाकरे भय्याजी जोशींवर कडाडले

दरम्यान, भय्याजी जोशींच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, त्यांनी केलेले वक्तव्य मी ऐकलेलं नाही. ते मी ऐकून त्यावर मी बोलेन. मुंबईतील आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, त्याला समजली पाहिजे. इतर भाषांचा इथे सन्मान आहे, कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही. जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो तोच इतरांच्या भाषेवर प्रेम करु शकतो, असेही ते म्हणाले.

Bhayyaji joshi
Shivsena : एकनाथ शिंदेंचा 'सेफ गेम'; रायगड अन् नाशिकमध्ये संपर्क मंत्रीच नाही, पालकमंत्री पदाचा क्लेम कायम!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com