Big Announcement : सरकारचा मोठा निर्णय: महिला व बाल विकास विभागात तब्बल 8 हजार 669 पदांची भरती

Vacancies Women and Child Development Department : विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Maharashtra government announces 8,669 vacancies in Women and Child Development Department.
Maharashtra government announces 8,669 vacancies in Women and Child Development Department.sarkarnama
Published on
Updated on

Aditi S Tatkare News : महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.

विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.

२३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

Maharashtra government announces 8,669 vacancies in Women and Child Development Department.
TET Exam: टीईटीमुळे मिळाला न्याय! तब्बल 13 वर्षांनंतर पगार सुरू, कोर्टाचा ZP प्रशासनाला दणका

गट ब 552 पदांची भरती

MPSC ने गट ब (अराजपत्रित)सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.जाहिरामध्ये तब्बल 552 पदांसाठी भरती होणार आहे. या जाहिरामधील 552 जागांपैकी ASO साठी 6 जागा, STI साठी 236 जागा तर PSI साठी 310 जागा आहेत.14 जूनला पूर्व परीक्षा घेण्यात येणार नाही. त्यानंतर मुख्य परीक्षा पार पडले. ASO आणि STI साठी मुलाखत होणार नाही. मात्र, PSI साठी मुलाखत होईल.

Maharashtra government announces 8,669 vacancies in Women and Child Development Department.
MPSC Exam News: MPSC विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! उत्तरपत्रिका आणि मूल्यांकनात मोठे बदल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com