Sharad Pawar NCP : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर आता विधानसभा काबीज करण्यासाठी आणि लोकसभेप्रमाणेच यश मिळवण्याच्या जिद्दीने शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी थेट फिल्डवर जाऊन काम करण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवककडून 288 मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने स्थानिक पातळीवर जाऊन तुतारी वाजवायचीच असा निर्धार केल्याचं दिसत आहे. यासाठी पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी राज्याभरातील 288 मतदारसंघासाठीच्या निरीक्षकांची नेमणूक केली आहे.
लोकसभेप्रमाणेच (Lok Sabha) विधानसभेत यश मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवर पक्षाच काम करण्यासाठी ही नेमणूक केली असून पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि पक्षाच्या भूमिका लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर असणार आहे. त्यामुळे आता पक्ष फुटीनंतरही लोकसभेत मिळालेल्या यशामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी शरद पवार गट ग्राउंड लेव्हलवर उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) गटाला फारसे यश मिळणार नाही, असं बोललं जात होतं. अनेक आमदार पवारांची साथ सोडून अजितदादांबरोबर गेले. शिवाय पक्षाचं घड्याळ हे चिन्ह देखील पवारांजवळ राहिलं नाही. याचा फटका त्यांना बसेल असा अंदाज लावला जात होता. मात्र, प्रत्यक्षात पवारांनी आपला राजकारणातील सर्व अनुभव पणाला लावत अभूतपूर्व असं यश मिळवून दाखवलं. त्यांनी 10 पैकी 8 जागा जिंकून अनेकांना बोटं तोंडात घालायला लावली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.