Rohit Pawar Tweet : राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप? आमदार रोहित पवारांच्या टि्वटमुळे चर्चांना उधाण

Maharashtra Politics: सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि...
rohit pawar
rohit pawarsarkarnama

Rohit Pawar News : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मागील दोन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. ठाकरे व शिंदे गटाकडून न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला जात आहे. आता सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवारांचं टि्वट चांगलंच चर्चेत आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टि्वट केलं आहे. त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. रोहित पवार(Rohit Pawar) यांनी टि्वटच्या माध्यमातून महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचे संकेत दिले आहेत. पवार टि्वटमध्ये म्हणाले, "भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं... एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते…असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली. त्यावेळी काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्याचं पवार यांनी टि्वटच्या माध्यमातून सांगितले.

rohit pawar
BJP ठरला उद्योगपतींचा पक्ष ; काँग्रेससह सगळ्यांनाच मागे टाकलं, देणग्यांमध्ये तिप्पटीनं वाढ ; बसपाची तिजोरी रिकामीच..

तसेच सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजल्याचंही पवार म्हणाले आहेत. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?" असं सूचक विधान आमदार रोहित पवारांनी टि्वटद्वारे केलं आहे.

rohit pawar
Jitendra Awhad : सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला प्रकरण भोवलं,जितेंद्र आव्हाडांसह सात जणांवर गुन्हा दाखल

''शिंदे गटाचा फायदा होणार नाही..''

शिवसेनेत फुट पडली तेव्हा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले होते की, त्यात त्यांचा काही रोल नाही, परंतु नंतर एकनाथ शिंदे यांनी सत्य सर्वांसमोर मांडलं. फडणवीसांनीही ते मान्य केलं. त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याची अशी दुटप्पी भूमिका नेहमी पुढे का येते याचं मला आश्यर्य वाटतं. मात्र, आगामी निवडणुकीत शिंदे गटाचा त्यांना फायदा होणार नाही. म्हणून फडणवीस लोकांची सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत असंही रोहित पवार म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com