Jitendra Awhad News : ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे बुधवारी (दि.१५) सायंकाळी कामकाज संपवून घरी जात असताना अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि अन्य तिघांनी आहेर यांच्यावर महापालिकेच्या गेटवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनं एकच खळबळ उडाली होती.
आता ठाण्याचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हल्ला प्रकरणी माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महेश आहेर यांच्यावर आव्हाडांच्या कुटुंबियांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर चार जणांनी येऊन त्यांना मारहाण केली होती. त्यांना मारहाण करणाऱ्यांमध्ये जितेंद्र आव्हाड यांचे खासगी सचिव अभिजीत पवार यांच्यासह तीन जणांनी आहेर यांच्यावर हल्ला केला. पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलीस पालिका मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण ?
महेश आहेर (Mahesh Aher)हे ठाणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत. मात्र, या कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये आहेर आणि अन्य व्यक्तीमध्ये संभाषण झाले. त्या संभाषणामध्ये आहेर यांनी आव्हाडांना मारहाण करण्याची भाषा केल्याचे समोर आले आहे. तसेच आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ऑडिओ क्लिपवर आव्हाडांची प्रतिक्रिया म्हणाले..
कथित ऑडिओ क्लिपमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे.यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, ''तो स्वत:च्या तोंडाने कबूल करत आहे. मी ही बातमी टीव्हीवर पाहिली. माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्यासाठी बाबाजी नावाचा शूटर असल्याचे कथित ऑडिओ क्लिपमध्ये व्यक्ती बोलतोय'', असं आव्हाड म्हणाले. तसेच माझी मुलगी, जावयापर्यंत आणि माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा माणूस या जगात पैदा व्हायचाय असंही ते यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.