Bihar Bhavan Controversy: 'बिहार भवन'चा मुद्दा पेटला, राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहेत का? बिहारच्या मंत्र्यानं ठणकावलं

Bihan Bhavan Political News: नितीश कुमार सरकारच्या अशोक चौधरी यांच्या जोरदार हल्लाबोलामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यांनी हे सगळे फालतू आणि घाणेरडे लोक असून हे भवन भावनेतून बनत आहे, अनेक राज्यात बिहार भवन बांधलं जात आहे,असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
Ashok Chaudhary Raj Thackeray .jpg
Ashok Chaudhary Raj Thackeray .jpgSarkarnama
Published on
Updated on

Bihar News: बिहार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य ‘बिहार भवन’उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. बिहारवासियांसाठी एक मोठं आधार केंद्र ठरणार आहे. मुंबईत बिहार भवनच्या माध्यमातून राज्याची प्रशासकीय आणि सामाजिक उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

याच बिहार भवनमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापलं आहे. अशातच पुन्हा एकदा बिहारी विरुद्ध मनसे वाद पेटला आहे. बिहारच्या मंत्र्यानं आता थेट राज ठाकरेंना इशारा दिला आहे.

बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे हे महाराष्ट्राचे राजा आहेत का ? महाराष्ट्रात बिहार भवन कसं बांधू देणार नाहीत ? आम्ही कुठल्याही परिस्थितीत बिहार भवन बांधणारच असल्याचा इशारा चौधरी यांनी दिला आहे.

नितीश कुमार सरकारच्या अशोक चौधरी यांच्या जोरदार हल्लाबोलामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यांनी हे सगळे फालतू आणि घाणेरडे लोक असून हे भवन भावनेतून बनत आहे, अनेक राज्यात बिहार भवन बांधलं जात आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Ashok Chaudhary Raj Thackeray .jpg
Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट! भाजपचा 'गेम' की काँग्रेसची सरशी? दोन बंडखोरांनी फिरवले सत्तेचे फासे

यावर मनसेकडून अविनाश अभ्यंकर यांनी बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, चौधरींनी आधी त्यांचं बिहार हे राज्य नीट करावं. त्यांच्या राज्यातील लोकं बाहेर जातात. त्यांना तिथं थांबवावं. त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करावा. म्हणजे त्यांना कळेल आपली लोक बाहेर का जातात? त्यांच्या राज्याला महाराष्ट्रावर अवलंबुन राहावं लागतं,ते लागणार नाही” असं उत्तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिलं.

अविनाश अभ्यंकर म्हणाले, राज ठाकरे (Raj Thackeray) ते आहेत, ज्यांनी 35 व्या वर्षी पक्ष काढला. लोकसभेला भाजपने आग्रह केल्यावर पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे होते. त्यांचा हा गुण घ्यावा. त्यांचं राज्य सुजलाम सुफलाम होईल. बाकीची दिवाळखोरी करण्यापेक्षा त्यांंचं त्यांचं बघावं” अशी टीका अविनाश अभ्यंकर यांनी केली.

Ashok Chaudhary Raj Thackeray .jpg
BJP political moves : गोगावलेंसमोर अडचणींचा डोंगर? मुलगा आत जाताच भाजपने टायमिंग साधली, बड्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय भूकंपाची शक्यता

मुंबईमध्ये अनेक लोक येतात त्यांचे बाकी ठिकाणी उपचार होतात. भवन नक्की काय आहे? त्याची माहिती घेतील, त्यानंतर साहेब भूमिका मांडणार असल्याचंही मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी सांगितले. बिहार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य बिहार भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com