BJP Mayor : काँग्रेसच्या हातातून महापालिका गेली, भाजपने सत्तागणित जुळवले; प्रकाश आंबेडकरांनाही धक्का!

Akola Municipal Corporation BJP VS Congress : भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी काँग्रेसने विरोधी पक्षांसोबत हातमिळवणी केली होती. मात्र, भाजपने सर्व खेळ पालटवत मित्र पक्षांसोबत घेत काँग्रेस आणि वंचितला धक्का दिला.
BJP VS Congress
BJP VS CongressSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : अकोला महापालिकेत काँग्रेस विरोधी पक्षांनासोबत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशी शक्यता होती. प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलून आपला सत्तेत वाटा नको मात्र भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखू, अशी चर्चा झाली. त्यासाठी आंबेडकर यांच्या निवास्थानी बैठक देखील झाली होती. त्यामुळे भाजप सत्तेपासून दूर राहणार अशा चर्चा होत्या. मात्र, भाजपने गेम फिरवत मित्र पक्षांना सोबत घेत ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन करून सत्ता आपल्याकडेच राहिल, अशी खेळी केली आहे.

अकोला महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचे गणित जुळले असून भाजप व मित्रपक्षांची सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन करण्यात आली असून गट स्थापनेसंदर्भातील पत्र अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहे.

महापालिकेतील एकूण संख्याबळ पाहता भाजपकडे ३८ नगरसेवक आहेत. त्यांना शिंदे गट (१), अजित पवार गट (१), शरद पवार गट (३) व शहर विकास आघाडी (१) यांचे पाठबळ मिळाल्याने एकूण संख्याबळ ४४ वर पोहोचले असून स्पष्ट बहुमत पूर्ण झाले आहे.

दरम्यान, दिवसभर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेस आमदार साजिद खान पठाण तसेच ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडून सत्तास्थापनेसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, संध्याकाळी भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी “आमच्याकडे बहुमत असून भाजप व मित्रपक्षांची सत्ता स्थापन होणार आहे,” असा दावा माध्यमांशी बोलताना केला. त्यानंतर काही वेळातच ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन झाल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.

BJP VS Congress
Talathi arrest : 'भाऊसाहेबां'मध्ये खळबळ! ‘24 कोटी’च्या खेळाची पोलखोल; चार तलाठी कोठडीत, आतापर्यंत 24 अटक, प्रशासन हादरलं

या पत्रात भाजप, शरद पवार गट, अजित पवार गट, शिंदे गट व अपक्ष नगरसेवकांचा समावेश असल्याचे नमूद आहे. शहर सुधार आघाडीचे गटनेते म्हणून पवन महल्ले यांची स्वाक्षरी या पत्रावर असून हे पत्र अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आले आहे.

या घडामोडींमुळे काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंग पावल्याचे चित्र आहे. सोमवारी विभागीय आयुक्तांकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर ३० जानेवारी रोजी सत्तास्थापनेचा मुहूर्त होण्याची शक्यता आहे.नदरम्यान, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंत्रालयात २९ महानगरपालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढली असून अकोला महापालिकेसाठी महापौर पद ओबीसी महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे शहराला पुन्हा एकदा महिला महापौर मिळणार हे निश्चित झाले आहे.

अकोला महापालिकेच्या गेल्या दोन दशकांच्या इतिहासावर नजर टाकली असता महापौर पदावर महिलांचे वर्चस्व दिसून येते. सन २००२ ते २०१९ या कालावधीत एकूण आठ महापौरांपैकी पाच वेळा महिला महापौरपदी विराजमान झाल्या असून पुरुषांना केवळ तीन वेळाच संधी मिळाली आहे. सन २००२ मध्ये सुमन गावंडे या अकोल्याच्या पहिल्या महिला महापौर ठरल्या होत्या.

महापौर पदाच्या शर्यतीत भाजप नगरसेविका

माधुरी क्षीरसागर, योगिता पावसाळे, वैशाली शेळके, मंजुषा शेळके, पल्लवी मोरे, शिल्पा वरोकार, रश्मी अवचार, निकिता देशमुख, सोनाली अंधारे, शारदा खेडकर, नीतू जगताप, प्राची काकड, कल्पना गोटफोडे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

पूजा गावंडे

भाजप–मित्रपक्षांची सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

BJP VS Congress
BJP in Mumbai BMC : दिल्लीने गाठ सोडवली, मुंबईत राजकीय रणधुमाळी; महापौरपदासाठी भाजपमध्ये ‘लाॅबिंग’, ही नावं आघाडीवर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com