BJP News : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी; ‘स्थानिक’च्या निवडणुकांसाठी भाजपची खेळी

BJP News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले.
Chandrashekhar Bawankule given key responsibility for Maharashtra local body polls.
Chandrashekhar Bawankule given key responsibility for Maharashtra local body polls.Sarkarnama
Published on
Updated on

BJP News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाजी मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामध्ये भाजपने आघाडी घेतली असून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांपासून उमेदवारांची निवड तसेच निवडणूक रणनीतीबाबतही बैठकांचा जोरदार सत्र सुरू आहे.

या घडामोडीत आता भाजपने माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमळ फुलविण्यासाठी बावनकुळे यांची निवडणूक प्रमुख नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

‘स्थानिक’ निवडणुकांच्या निमित्ताने पक्षाने पुन्हा एकदा बावनकुळे यांच्या संघटनकौशल्यावर विश्वास दाखविल्याचे मानले जात आहे. मागील काही वर्षांत बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात भाजपला महाराष्ट्रात सुगीचे दिवस आले होते. त्यांच्याच कार्यकाळात भाजपला विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व असे यश मिळाले.

Chandrashekhar Bawankule given key responsibility for Maharashtra local body polls.
Shirdi BJP vs RSS : मंत्री विखेंविरोधात 'RSS'च्या जुना भिडूनं ठोकला शड्डू? शिर्डीत बरीचं काही उलथापालथ होणार

संघटनात्मक वाढीसह निवडणुकीच्या राजकारणातही पक्षाने संपूर्ण राज्यभर आपली ताकद जोमाने वाढविली आहे. त्यामध्ये बावनकुळे यांचा मोलाचा वाटा नाकारता येणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सातत्याने याचा आवर्जून उल्लेखही केला जातो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राज्य पिंजून काढले होते. इतर पक्षांतील अनेक मोठ्या नेत्यांना भाजपमध्ये आणण्यातही त्यांनी महत्वाची भूमिका निभावली.

Chandrashekhar Bawankule given key responsibility for Maharashtra local body polls.
Jayant Patil On BJP: जयंत पाटलांनी भाजपवर पहिला डाव टाकला, 40 वर्षांपासून एकनिष्ठ असणारा गडी हेरला

विधानसभेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पक्षाची ताकद कायम असल्याचे दाखवून द्यावे लागणार आहे. ही निवडणूक एकाअर्थाने भाजपसह महायुतीसाठीही प्रतिष्ठेची असणार आहे. त्यासाठी भाजपने बावनकुळे यांच्या रुपाने हुकमी एक्का बाहेर काढत विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com