Ashadhi Wari 2024 :राज्यभरात आज आषाढी एकदशी सोहळा अत्यंत भक्तीभावाने साजरा झाला. पंढरपूरात दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकऱ्यांनी हजेरी लावून विठूरायाचं दर्शन घेतलं. या आषाढी वारीसाठी राज्यभरातून यंदाही मानाच्या तसेच अन्य दिंड्या विठूनामाचा गजर करत पंढरीत दाखल झाल्या.
दरम्यान यंदाच्या आषाढी वारीत ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे देखील सहभागी होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अखेर आषाढी एकादशीचा सोहळा झाला मात्र हे दोन्ही नेते वारीत सहभागी झाल्याचे दिसले नाहीत. त्यावरून आता भाजपाने शरद पवार आणि राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र भाजपने म्हटले आहे की, 'शेवटी ते वारीला आलेच नाहीत... वारीतल्या भगव्या पताक्याचा राहुल गांधी आणि शरद पवारांना इतका द्वेष का? शरद पवार आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांचे जे काही थोडे खासदार अपप्रचारमुळे निवडून आले आणि विशेष व्होट बँक नाराज होईल या भितीने दोघांनी वारीत येण्याचे टाळले.'
याशिवाय 'यापूर्वी विठुरायची मूर्ती नाकारलेल्या राहुल गांधीने वारीचे आमंत्रण स्वीकारून देखीलही वारीत सहभागी झाला नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा वारकऱ्यांचा, परंपरेचा अपमान केला. हिंदू धर्म ज्यांचा चेष्टेचा विषय असतो अशा शरद पवारांना यंदा वारी आठवली, मात्र आपल्या सवयीप्रमाणे त्यांनी शेवटी काढता पाय घेतला. शेवटी आमचे तुकोबाराय म्हणालेच आहेत येऱ्यागबाळ्याचे काम नोहे.' असा टोलाही लगावला.
याचबरोबर 'वारीतली भगवी पताका खांद्यावर घेण्यासाठी पाठीशी पुण्याई आणि विठूरायाबद्दलची आस्था हवी, तुम्ही माध्यमांना हाताशी धरून वारीत सहभाग घेण्याच्या वावड्या उठवल्या खऱ्या मात्र तुमची पुण्याई कमी पडली. गेली अनेक शतके वारीची ही परंपरा चालत आली आहे. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी तितक्याच तन्मयतेने दरवर्षी येत असतात. हिंदूद्वेषी आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना वारीतला रामकृष्ण हरीचा जयघोष रुचलाच नसता.' असं म्हणत भाजपने टीका केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.