Sharad Pawar : शरद पवार आषाढी वारी करणार, बारामती ते सणसर अंतर...

Sharad Pawar Will Participate in ashadhi wari : शरद पवार यांच्या सोबत माजी आमदार उल्हास पवार , बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी वारीत सहभागी होणार आहेत
Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama

Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार हे आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा 7 जुलैला बारामती ते सणसर हे अंतर पार करणार आहे. त्या दिवशी शरद पवार वारीत सहभागी होतील.

पंढरपुरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत.

'एक दिवस तरी वारी अनुभवावी' या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शामसुंदर महाराज सोन्नर, सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी सोमवारी (ता.17) मुंबईतील 'सिव्हर ओक' या शरद पवार Sharad Pawar यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

वारीतील विचार, शिस्त, बंधूभाव, समता हा विचार ही मंडळी 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' यात सहभागी होऊन दिवसभर चालून समजून घेतात. या दरम्यान दुपारच्या विसाव्यापर्यंत काही निवडक लोक आपले अनुभव कथन करतात. याची माहिती शरद कदम यांनी पवार यांना दिली.

Sharad Pawar
Ramdas Athawale : ठरलंय दादांच्या राष्ट्रवादीला केंद्रात एक मंत्रिपद, केंद्रात ३ टर्म मंत्री असलेल्या बड्या नेत्याचा दावा

'उपक्रम अत्यंत स्तूत्य असून सामाजिक एकोपा निर्माण होण्यासाठी फार महत्वाचा आहे, असे शरद पवार म्हणाले. या उपक्रमात या वर्षी मी सहभागी होईल, असेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या सोबत काँग्रसचे Congress ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार , जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, कवी अरुण म्हात्रे, मुकेश माचकर रविंद्र पोखरकर आदी सहभागी होणार आहेत.

'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रमा गेली दहा वर्षे राबविला जात आहे. यंदाचे अकरावे वर्ष असून शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली आणि शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, सुभाष वारे, राजाभाऊ अवसक, विशाल विमल, दत्ता पाकिरे यांच्या पुढाकाराने याचे आयोजन केले जाते.

Sharad Pawar
Congress Vs BJP : मोदींच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्र्याला लिहिता आला नाही, 'बेटी बचाओ, बोटी पढाओ' संदेश...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com