Rahul Gandhi : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही करणार पंढरीची वारी? विठुरायाचे दर्शन घेणार?

Rahul Gandhi Will Walk in Pandharpur Ashadhi Wari : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात 13 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पक्षात चांगला कॉन्फिडन्स आला आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीआधी राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी झाले तर ते लाखो वारकऱ्यांपर्यंत पोहचू शकतात.
Rahul Gandhi in Pandharpur Ashadhi Wari
Rahul Gandhi in Pandharpur Ashadhi WariSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi Will Walk in Pandharpur Ashadhi Wari : आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात. आषाढी वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो.

या पंढरपूरच्या वारीचं आकर्षण वारकऱ्यांप्रमाणेच सर्वसामान्य लोकांनाही असतं. त्यामुळे संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने जातात त्यावेळी लाखो भाविक पालखी दर्शनासाठी आणि पालखी मार्गावर चालण्यासाठी जात असतात.

अनेक राजकीय पुढारी देखील या वारीत सहभागी होतात. तर यंदाची आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आहे. या एकादशीनिमित्त पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. याच सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे सहभागी होणार आहेत. बारामती ते इंदापूरच्या सणसरपर्यंतचे 17 किलोमीटरचे अंतर ते पायी चालणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर शरद पवारांप्रमाणे आता राहुल गांधीही वारीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी (Rahul Gandhi) आषाढी वारीत सहभागी होण्याबाबतचा विचार करत आहेत. राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. अशात पक्षाचे महत्वाचे नेते पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास काँग्रेसाठी ते फायदेशीर ठरु शकते. राहुल गांधींनी यापूर्वी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हजारो किलोमीटरची पायी प्रवास केला आहे. त्यामुळे वारीत चालणं त्यांच्यासाठी सहज शक्य असल्याचं बोललं जात आहे.

Rahul Gandhi in Pandharpur Ashadhi Wari
Shadow PM Rahul Gandhi : राहुल गांधींना का म्हटलं जाईल ‘शॅडो PM’? मोदींनी शपथ घेतलेल्या दिवसापासून मिळणार मान...

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात 13 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षात चांगला कॉन्फिडन्स आला आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीआधी राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी झाले तर ते लाखो वारकऱ्यांपर्यंत पोहचू शकतात. शिवाय ते सर्वसामान्यांचं नेतृत्व असल्याचा संदेशही लोकांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे आता राहुल गांधी खरंच वारीत सहभागी होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Rahul Gandhi in Pandharpur Ashadhi Wari
Maratha Reservation : 'त्या' मराठा आंदोलकांवरची अटकेची टांगती तलवार कायम; तब्बल 521 गुन्हे सरकार कधी मागे घेणार..?

आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरपुरात विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेणार असल्याच्या बातमीस काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने दुजोरा दिला आहे. शिवाय माळशिरस ते वेळापूर या मार्गावर राहुल गांधी वारकऱ्यांबरोबर वारीत सहभागी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com