BJP Election Strategy : ZP साठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; उमेदवार निवडीसाठीची प्रोसेस तयार

Maharashtra local body elections : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाकडून या निवडणुकांमध्ये विजयी होईल असा उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू केली आहे.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra local body elections : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्षाकडून या निवडणुकांमध्ये विजयी होईल असा उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू केली आहे.

स्थानिकच्या निवडणुकीत आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी मित्र पक्षांमध्येच स्पर्धा सुरू झाल्याचं दिसत आहे. तर महायुतीत विधानसभेत मोठा भाऊ ठरलेल्या भाजपने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही आपल्या जास्त जागा याव्यात यासाठी रणनीती आखली आहे.

यासाठी भाजपने योग्य उमेदवारांचा शोध घेण्याची जबाबदारी निवडणूक संचलन समितीकडे दिली आहे. या समितीकडून झेडपी गटासाठी 5 तर पंचायत समिती गणासाठी प्रत्येकी 2 नावे मागितली असून दिवाळीनंतर होणाऱ्या कोअर कमेटीच्या बैठकीत या नावावर चर्चा होणार आहे.

BJP
Gunratna Sadavarte : 'पंडित नथुराम गोडसेंसाठी आनंद दिघे लढले, एकनाथ शिंदे आणि आमचा DNA एकच...', गुणरत्न सदावर्तेंचं वादग्रस्त वक्तव्य

त्यामुळे आता भाजपने प्रत्येक गट आणि गणावर लक्ष केंद्रित केलं असून स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपलीच सत्ता राहावी, यासाठी भाजपने तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. ही 'निवडणूक संचलन समिती' प्रत्येक तालुक्यात असेल. ज्यामध्ये ज्येष्ठ पदाधिकारी, निवडणूक लढणार नसलेल्या पदाधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.

BJP
Cyber Fraud in Pune : कोथरूडमधील वयस्कर व्यक्तीने क्षणात दीड कोटी गमावले, सायबर गुन्हेगाराने NIA अधिकारी असल्याचं सांगितलं अन् जाळ्यात अडकले

या समितीला त्या-त्या भागातील राजकीय, सामाजिक स्थितीचा आढावा घेऊन संभाव्य उमेदवारांची माहिती गोळा करावी लागणार आहे. या माहितीच्या आधारे जिल्हा परिषदेसाठी पाच आणि पंचायत समिती गणाकरीता दोन नावे कोअर कमेटीकडे पाठवावी लागणार आहेत.

निवडणूक समितीने पाठवलेल्या नावावर कोअर कमिटीत चर्चा होईल यानंतर उमेदवार कोण हे ठरवलं जाणार आहेत. शिवाय समिती ज्या उमेदवाराची शिफारस कोअर कमिटीकडे करेल त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक मुद्देही समितीला द्यावे लागणार आहेत. यामुळे भाजपने निवडणुकीसाठी तगडं प्लॅनिंग आतापासून सुरू केल्याचं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com