Sudhir Mungantivar News: क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांबाबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान; म्हणाले...

Political News : काँग्रेसच्या सात ते आठ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. यामुळे विधानपरिषद रिंगणात उतरलेले 12 पैकी 9 जण महायुतीचे उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून आले.

या निवडणुकीत काँग्रेसच्या सात ते आठ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांची ओळख पटली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली. काँग्रेसकडून त्याबाबतचा अहवाल हायकमांडकडे पाठवण्यात आला आहे.

त्यावर आता काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागले असतानाच त्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी (Sudhir Mungantivar) मोठं विधान केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटल्याने मविआच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला आहे. या क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना काँग्रेस 6 वर्षांसाठी निलंबित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली आहे. ते आमदार कोण आहेत. ते काँग्रेसला (Congress) डमी मतपत्रिकेमुळे लक्षात आले आहे. त्यांचा अहवाल काँग्रेसकडून दिल्लीला पाठविण्यात आला आहे. त्यावर 19 जुलैपर्यंत वरिष्ठ पातळीवरून निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेसच्या नेत्याकडून सांगण्यात येत आहे.

काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करताना दहा आमदारांचा एक गट तयार केला होता. त्यानुसार कोणत्या उमेदवाराला कोणता पसंतीक्रम द्यायचा हे आमदारांना सांगितले होते. डमी मतपत्रिकेद्वारे काँग्रेसने फुटलेल्या आमदारांचा शोध घेतला आहे. काँग्रेसने प्रत्येक आमदारांना डमी मतपत्रिका दिली होती.

Sudhir Mungantiwar
Nana Patole : नशिबात असेल ते होईल; नाना पटोलेंच्या गळ्यात 'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा

डमी मतपत्रिकेवर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असा पसंतीक्रम द्यायचा होता. आमदारांच्या डमी मतपत्रिकेतही याची नोंद करुन ठेवण्यात आली होती. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सतेज पाटील (Satej Patil), अभिजीत वंजारींची निवडणूक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या लक्षात फुटलेली मते लक्षात आली आहेत.

क्रॉस व्होटिंग करणारे हे महाविकास आघाडीचे आमदार नाराज होते. त्यामुळे ते निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी येऊन भेटत होते. त्यामुळे त्यांनी क्रॉस व्होटिंग करीत महायुतीला मतदान केले असल्याचा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

दरम्यान, या क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारावरून संजय राऊत यांनी महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. 10 कोटी आमदारांना रोख दिल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

Sudhir Mungantiwar
Prakash Ambedkar on Vishalgad Violence : विशाळगडावरील 'राड्या'वरुन आंबेडकरांचा भिडे गुरुजींवर गंभीर आरोप; म्हणाले, संभाजीराजेंचं आंदोलन...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com