
Bjp News : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण राज्यभरातील वातावरण तापले आहे. त्याच प्रकरणातून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. माजी मंत्री सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून एकमेकांवर टीका केली जात असतानाच आमदार अमोल मिटकरी यांनी धस यांच्यावर टीका केल्याने आता भाजपच्या एका बड्या नेत्याने धस यांची बाजू घेतली असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर अहिल्यानगर दौऱ्यावर असताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही.'
भाजपचे (Bjp) आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. धस यांनी मुंडेंविरोधात सुपारी घेतली असे त्यांनी म्हटलं होते. मिटकरी यांच्या या वक्तव्यावर देखील दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेकडे राजकीय अभिवेषातून न पाहाता सुरेश धस यांनी घेतलेली ही भूमिका आहे. कुठलाही गुन्हा हा गुन्हा असतो त्यामुळे त्यात पक्षीय राजकारण येत नाही. कोणी सुपारी घेतली नाही, किंवा कुणी कोणाला लक्ष्य करीत नाही, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात एकंदरीत दरेकर यांनी एक प्रकारे सुरेश धस यांची बाजू घेतली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे या घटनेवरून राज्यातील सर्व सरपंच अडचणीत आहेत असे निकष लावणे चुकीचे आहे. या पुढे अशा घटना होणार नाहीत. जे-जे आरोपी असतील त्यांना ठेचून काढण्याची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री घेत आहेत, असेही यावेळी दरेकर यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.