
Directorate of Vocational Education and Training scam : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या साहित्य खरेदीत 100 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत अथवा विभागीय स्तरावर उच्चस्तरीय सखोल चौकशी केली जाणार आहे. याबाबत कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत घोषणा केली.
यानंतर संचालनालयात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी 2021मध्ये हा गैरव्यवहार चर्चेत होता. विधानसभेत हा घोटाळा गाजला होता. त्यावर चर्चा देखील झाली होती. परंतु पाच वर्षांनंतर आता पुन्हा हा गैरव्यवहाराचा मुद्दा समोर आला असून मंत्री लोढा यांनी विधान परिषदेत चौकशीचे संकेत दिले आहे.
संचालनालयातील विविध साहित्य खरेदीतील गैरव्यवहारप्रकरणी विधान परिषदेत 2021 मध्ये प्रदीर्घ चर्चा झाली होती. तसेच तीन अधिकाऱ्यांचे निलंबनही झाले होते. त्यातील विजयकुमार गौतम हे निवृत्त झाले आहेत, लाच (ACB) घेतल्याने अटक झालेले निलंबित अनिल जाधव पुन्हा विभागात कार्यरत आहेत. तसेच योगेश पाटील अद्यापही कोणत्याही कारवाईविना विभागात कार्यरत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील काही फायली गायब करण्यासह हे प्रकरण अडवून ठेवणारे प्रदीप शिवतारे यांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी विधान परिषदेचे (State legislative councils) सदस्य दादाराव केचे, अभिजित वंजारी यांनी केली होती. शिवतारे आणि पाटील यांच्या कारनाम्याचा पाढाही त्यांनी सभागृहात वाचून दाखवला होता.
मंत्री लोढा यांनी सखोल चौकशी करून पुढील अधिवेशनापूर्वी यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले. मंत्री लोढा यांच्या या घोषणेनंतर पाच वर्षांपूर्वीचे पडद्याआड गेलेले व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आलं आहे. या घोषणेनंतर संचालनालयात वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.
100 कोटींच्या साहित्य घोटाळ्यातील अनेक दस्तावेज, सनदी अधिकाऱ्यांचे अहवाल लक्षात घेऊन लोकायुक्तांनी सक्तीने कारवाई करण्याचे आदेश वर्षभरापूर्वी दिले होते; मात्र विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून हे प्रकरण दाबण्यात आले होते. आमदार दादाराव केचे यांनी हे प्रकरण सभागृहापुढे मांडल्यानंतर मंत्री लोढा यांनी कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.