Sangram Jagtap complaint : मालेगावच्या उर्दू संस्थेकडून 100 कोटींहून अधिक निधीची लूट; जगतापांच्या घणाघातनंतर मंत्री भुसे 'अ‍ॅक्शन मोड'वर

Sangram Jagtap Flags 100 Crore Nashik Urdu Institute Scam : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांची विधिमंडळात लक्षवेधीवर शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांचे चौकशीचे आश्वासन दिले.
Sangram Jagtap complaint
Sangram Jagtap complaintSarkarnama
Published on
Updated on

Nashik education fund controversy : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथल्या उर्दू माध्यमातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये सरकारी अधिकारी व संस्थाचालकांनी संगनमताने बोगस कारभार करत सरकारच्या सुमारे 100 कोटींपेक्षा जास्त निधीची लूट केली आहे.

या संबधित शैक्षणिक संस्थांची व सरकारी अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हेशाखा व विशेष चौकशी पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेसचे आमदार संग्राम जगताप यांनी विधिमंडळात केली. शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी जगताप यांच्या लक्षवेधीला उत्तर देत तातडीने एसआयटीमार्फत चौकशी करून उच्च न्यायालयातही सुरू असलेल्या सुनावणीस सरकार म्हणणे मांडणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जगताप म्हणाले, "अन्जुमन-ए-तालीम संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, स्टुडंन्टस वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी संचलित स्वेस हायस्कूल, अन्जुमन-मोईनुत-तुलबा संचलित मालेगाव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, तसेच सिटीजन वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार प्रायमरी स्कूल या शैक्षणिक संस्थांमध्ये नावीद अख्तर या व्यक्तीमार्फत चालवते जाते".

'तत्कालीन शिक्षक उपसंचालक, शिक्षणाधिकारी, नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेचे अधीक्षक यांच्याशी संगनमत करून काही बनावट कागदपत्रे तयार केली. या बनावट कागदपत्राद्वारे नवीन तुकड्यांची मान्यता मिळवणे, कर्मचाऱ्यांची मागील तारखेची नेमणूक दाखवून ज्यांनी शाळेत सेवाच दिलेली नाही अशा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती दाखवून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारकडून प्राप्त करून घेतले आहे', असा दावा आमदार जगताप यांनी केला.

Sangram Jagtap complaint
Shrigonda land dispute : सुनेच्या नावे केलेली जमीन परत सासू-सासऱ्यांना मिळणार; न्यायाधिकरणाचा मोठा निकाल

'या बेकायदेशीर कामामध्ये संबंधित शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, लिपिक यांचा सहभाग आहे. या बोगस कारभाराच्या माध्यमातून शासनाची आजतागायत 100 कोटींपेक्षा जास्त निधीची लूट झाली आहे', असा दावा संग्राम जगताप यांनी केला.

Sangram Jagtap complaint
Vijay Wadettiwar Congress : 'होय सर्वांच्याच डोक्यात हवा गेली होती'; ठाकरेंच्या वक्तव्यास वडेट्टीवारांचा दुजोरा

त्याअनुषंगाने सिटीजन वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार प्रायमरी स्कूलच्या संस्थाचालकांच्या विरोधात नाशिक ग्रामीण पोलिस ठाण्यात 10 जून रोजी तक्रार दाखल झाली आहे. सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार करणाऱ्या संबंधित अधिकारी व संस्थांची सखोल चौकशी करून संबंधितांना कडक शासन करावे, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी चौकशीक करून कारवाईचे आश्वासन दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com