Ramdas Athawale : 'झटका की हलाल, मुस्लिम सैन्या'वर आठवलेंचा नितेश राणेंना चिमटा, औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरूनही फटकारले

Ramdas Athawale On Nitesh Rane : भाजप मंत्री नितेश राणेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य नव्हते असे वक्तव्य करून राज्यात वाद निर्माण केला होता. या वादापाठोपाठ त्यांनी झटका आणि हलाल वादाला हवा दिली होती.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News: गेल्या काही दिवसापासून भाजप मंत्री नितेश राणे यांनी उखरून काढलेल्या औरंगजेबाची कबर, झटका की हलाल, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते अशा मुद्द्यांमुळे जोरदार चर्चा होत आहे. या मुद्द्यांमुळे राज्याचे राजकारण तापले असून दोन समाजात तेढ निर्माण होताना दिसत आहे.

तर आता हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी केली आहे. जर ती कबर हटवली नाही तर कारसेवक ती हटवतील असा इशारा सरकारला दिला आहे. या सर्व मुद्द्यांवर भाजपचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट भूमिका मांडताना राणेंचा चिमटा काढला आहे. तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना देखील फटकारले आहे.

नितेश राणे यांनी, मुस्लिम समाजातील लोकांना वेठीस धरणारी वक्तव्य केली होती. त्यापाठोपाठ त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिमन नव्हते, झटका सर्टिफिकेट असलेले मटन विका असाही फर्मान काढला.

तर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुढे आणत राज्यातील सलोख्याना तडा जाईल असे वातारण गरम करून सोडले. यानंतर आता त्यांच्यावर टीका होत आहे. अशातच केंद्रीय भाजपचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील या मुद्द्यांना हात घालत फटकारले आहे.

यावेळी आठवले यांनी झटका की हलाल यावरून नितेश राणेंचा चिमटा काढताना, मटण झटका असो वा हलाल आपल्याला मटण खायला मिळायला पाहिजे. झटक्याने करा अगर पटक्या ने करा, त्याच्याशी काही फकर पडत नाही.

पण नितेश राणेंनी हार्ड भूमिका घेऊ नये असाही सल्ला आठवले यांनी दिला आहे. तर राणेंच्या अशा वक्तव्यामुळे मुसलमान हा देशही सोडून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे संविधानाचा विचार करता आपण नितेश राणेंच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे म्हटले आहे.

Ramdas Athawale
Ramdas Athawale : भाजपच्या जखमेवर मित्र आठवलेंनी मीठ चोळलं; म्हणाले, 'सुधीरभाऊंना मंत्री करायलाच पाहिजे होतं'

माजी मंत्री नारायण राणे आपले जवळचे मित्र असून त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी जातीजातीत संघर्ष निर्माण होईल अशी वक्तव्ये त्यांनी टाळावीत. आपण मंत्रिपदावर आहोत याचे भान ठेवून बोलावं. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम होते.

शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख हा मुस्लिम होता, असे पुरावे पुढे आलेले आहेत. अनेक शूर मुसलमान हे मुघलांच्या विरोधात लढलेले त्याचेही पुरावे पुढे आलेले आहेत. त्यामुळे राणे यांनी थोडं भान ठेवून बोलण्याची गरज असून, गरज असले तर अभ्यास करावा.

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आत्ताच पुढे यायचं कारण काय? असा सवाल उपस्थित करताना आठवले म्हणाले, औरंगजेबाची कबर काढून इतिहास बदलणार नाही. मात्र यामुळे हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल.

हे टाळण्यासाठी सरकारने कायदा व सुव्यवस्था राहावी, अशा पद्धतीने निर्णय घ्यावा. जर सरकारने याला पायबंद घातला नाही तर दंगली होणार होऊन लोकांमधील गैरसमज वाढतील, असाही इशारा आठवले यांनी दिला आहे.

Ramdas Athawale
Ramdas Athawale : धनंजय मुंडे प्रकरणात आठवलेंची उडी, मागितला राजीनामा

तर आठवले यांनी, काँग्रेसकडून शिवरायांची बदनामी करण्याचं षडयंत्र सुरू असल्याच्या मंत्री शिवेंद्रसिहराजे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आठवले म्हणाले, काँग्रेस पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा लपवून ठेवला. मंत्री शिवेंद्रसिहराजे यांचा आरोप योग्यच आहे. त्यामुळे छावा चित्रपटातून हा इतिहास आता पुढे येत आहे असं ही ते म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com