ठाकरे सरकारचं चहलांना एक हजार कोटी वसुलीचं टार्गेट ; भाजपचा आरोप

वसुलीचं काम महाविकास आघाडीचा सर्वात मोठा एजंट असलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असंही अमित साटम यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray,Amit Satam

Uddhav Thackeray,Amit Satam

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी लेटरबॉम्ब टाकला होता. यात त्यांनी 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला होता. या प्रकरणामुळे देशमुखांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता भाजपचे आमदार अमित साटम ( Amit Satam)यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग आणि मुंबई महानगरपालिका या सर्वांना 1000 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप अमित साटम यांनी केला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला आहे. हे वसुलीचं काम महाविकास आघाडीचा सर्वात मोठा एजंट असलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असंही अमित साटम यांनी म्हटलं आहे.

अमित साटम म्हणाले, ''आता ख्रिसमस आहे आणि त्यानंतर नवीन वर्ष आहे. या काळात 1000 कोटी रुपयांच्या वसुलीचं षडयंत्र महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Government)करणार आहे. कशाप्रकारे करणार?... तर क्लब, रेस्टॉरंट, बार, लग्नसोहळे आहेत आणि आता तर त्यांनी सांगितलंच आहे की घरातही येणार...तुम्ही इमारतीच्या टेरेसवर पार्टी केली तरी तेथे बीएमसी येणार... पोलिस येणार,''

मुंबई महापालिकेकडून विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून तसेच पोलिस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत त्यांनी नियमावली केली आहे. बंदिस्त जागेत क्षमतेच्या 50 टक्केच उपस्थिती, खुल्या जागेत क्षमतेच्या 25 टक्केच उपस्थितीला परवानगी, मात्र 1 हजारांपेक्षा अधिक उपस्थिती नियोजित असेल तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्व परवानगी आवश्यक, हॉटेल्स, उपहारगृह, सिनेमागृह, मॉल्स आदी ठिकाणी नियमांचे योग्य पालन करावे, नाताळ, नववर्ष स्वागताचे समारंभ आयोजन टाळावे, मास्कचा वापर करावा, कोविड लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, अशी नियम महापालिकेने केले आहेत.

<div class="paragraphs"><p>Uddhav Thackeray,Amit Satam</p></div>
भाजपवाल्यांनो, बंगळुरूचे राजभवन गाठा, बोम्मईंचे सरकार घालवाच!

सरकारनं आखून दिलेल्या मर्यादांचे योग्य पालन करावे, कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी, मास्क लावण्यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी जनतेला केले आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com