Maharashtra Politics : कुंभमेळ्यातील पाणी अशुद्ध म्हणणाऱ्या राज ठाकरेंना फडणवीसांच्या शिलेदाराचा करारा जबाब, म्हणाले, 'तीन वेळा...'

MLA Ram Kadam Slams Raj Thackeray : बाळा नांदगावकर देखील एका छोट्याश्या कमंडलूमधून पाणी घेऊन आले मी म्हटलं हड... मी पाणी पिणार नाही, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. त्याला भाजप आमदाराने उत्तर दिले.
Raj Thackeray & Devendra Fadnavis.
Raj Thackeray & Devendra Fadnavis.Sarkarnama
Published on
Updated on

Ram Kadam News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रविवारी (ता.9) 19 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. बाळा नांदगावकर देखील एका छोट्याश्या कमंडलूमधून पाणी घेऊन आले मी म्हटलं हड... मी पाणी पिणार नाही.'

राज ठाकरेंच्या या वक्तव्याला भाजपचे आमदार राम कदम यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, 'मी स्वतः तीन वेळा कुंभमेळ्यात स्नान केले आहे. तिथले पाणी स्वच्छ आहे. अनेक नेते, अभिनेते, उद्योगपती आणि साधू-संत तिथे स्नानासाठी जातात. जे तिथे गेलेच नाहीत त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असल्याचे म्हणणे योग्य नाही.'

Raj Thackeray & Devendra Fadnavis.
Satish Bhosale News : भाजपा म्हणते 'खोक्या' आमचा नाहीच! चार वर्षापूर्वीच त्याची पक्षातून हकालपट्टी!

राम कदम पुढे म्हणाले, 'कुंभमेळ्यात 45 दिवसांत 65 कोटी लोकांनी पवित्र स्नान केले. त्यामुळे हे केवळ श्रद्धेचा उत्सव नाही, तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या संगमाचा प्रतीक आहे. या श्रद्धेचा सन्मान राखला पाहिजे.'

राम कदम यांनी गंगा स्वच्छतेच्या मुद्द्यावरही भाष्य केले. 'मोदी सरकार नद्या स्वच्छ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गंगा नदीत पूर्वी लाखो कारखान्यांचे आणि गटारांचे पाणी मिसळत होते. आता त्यावर नियंत्रण आणले जात आहे. अजूनही काही काम करावे लागेल, पण गंगा पूर्णपणे स्वच्छ होण्याच्या दिशेने सरकार कार्यरत आहे," असे ते म्हणाले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात कुंभमेळ्यातील स्नानावर टीका करताना म्हटले होते, "कोरोना महामारीनंतर लोक दोन वर्षे तोंडाला मास्क लावून फिरत होते, पण नंतर कुंभमेळ्यात जाऊन स्नान करत होते. श्रद्धेला काही अर्थ आहे की नाही? परदेशातील नद्या स्वच्छ असतात, पण आपल्या येथे नद्यांमध्ये प्रदूषित पाणी सोडले जाते. राजीव गांधी यांच्या काळापासून गंगा स्वच्छ होईल असे ऐकत आलो, पण अजूनही ती स्वच्छ नाही."

Raj Thackeray & Devendra Fadnavis.
Nirmala Sitharaman GST update : सर्वसामान्यांना दिलासा मिळणार? ; GST स्लॅबमध्ये मोठ्या बदलाचे अर्थमंत्री सीतारामन यांचे संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com