Nagpur BJP: नगरसेवकांचा 120 चा आकडा कसा गाठणार? नागपुरात भाजपचा कस लागणार

BJP sets 120 corporators target in Nagpur:भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अनुभवी आहेत.त्यांच्या नेतृत्वात यावेळी महापालिकेची निवडणूक लढण्यात येणार आहे. त्यामुळे १२०चा आकडा गाठण्याचे आव्हान त्यांच्यावर राहणार आहे.
Nagpur BJP
Nagpur BJPSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नागपूर महापालिकेची निवडणूक येत्या सहा महिन्याच्या आत घोषित होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपने यावेळी तब्बल १२० नगरसेवकांना निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. १५० सदस्यांच्या महापालिकेत भाजप एवढा मोठा आकडा कसा गाठणार असा सवाल उपस्थित केला जात होता. भाजपने नागपूर शहराची जंबो कार्यकारिणी जाहीर करून याचे उत्तर दिले आहे.

महापालिकेच्या निवडणुकीची गोळाबेरीज डोळ्यासमोर ठेवून भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी नागपूर शहराची जंबो कार्यकारिणी जाहीर केली.कार्यकारिणीसोबतच तब्बल १६ आघाड्यांचे पदाधिकारी जाहीर केले आहे. ज्येष्ठ नाराज होणार नाही याची काळी घेण्यात आली आहे. आघाड्यांच्या माजी अध्यक्षांना त्याच आघाडीत कायम ठेवून त्यांच्यावर पालक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजपच्या कार्यकारिणी १५ उपाध्यक्ष, चार महामंत्री, १७ मंत्री आहेत. त्यासोबतच महिला आघाडी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, झोपडपट्टी आघाडी, सांस्कृतिक आघाडी,ओबीसी आघाडी, क्रीडा आघाडी, कामगार आघाडी, सी.एस. आघाडी, औद्योगिक आघाडी, सहकार आघाडी, व्यापारी आघाडी, मीडिया सेल, हलबा आघाड्यांमध्ये सर्वच समाजातील घटकांना सामावून घेण्यात आले आहेत.

भाजपने नागपूर महापालिका पुन्हा जिंकण्याचा संकल्प केला आहे. यावेळी १५० सदस्यांना महापालिकेत १२० नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले आहे. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच हा आकडा जाहीर केला आहे. यापूर्वी भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अनुभवी आहेत. ते यापूर्वी महापौर तसेच महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती होती. त्यांच्या नेतृत्वात यावेळी महापालिकेची निवडणूक लढण्यात येणार आहे. त्यामुळे १२०चा आकडा गाठण्याचे आव्हान त्यांच्यावर राहणार आहे.

Nagpur BJP
Gokul Milk Scam: कोल्हापूर सर्किट बेंचने गोकुळ प्रशासनाला झापले; संचालकांवर कारवाई का नाही?

नागपूर शहरात भाजपचे चार आमदार आहेत. दोन आमदार काँग्रेसचे आहेत. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजप विजयाच्या समीप पोहोचली होती. अवघ्या दहा हजार मतांच्या फरकाने भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव झाला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांना भाजपला पराभूत करता आले नाही. भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये मोठा फरक आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही उत्तर नागपूरमधून आघाडी घेता आली नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com