BJP national president election: मोठी बातमी ! भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला 'या' तारखेपासून होणार सुरुवात? 15 राज्यातील प्रदेशाध्यक्षही ठरले

BJP president selection process News : गुरुवारपर्यंत जवळपास 15 राज्यातील प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत. 19 एप्रिलपर्यंत आणखी पाच ते सहा राज्याच्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिल्ली विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेला वेग आला आहे. भाजपकडून निवडणूक घेण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत जवळपास 15 राज्यातील प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत. 19 एप्रिलपर्यंत आणखी पाच ते सहा राज्याच्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासोबतच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 20 एप्रिलपासून नामांकन प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. याच दिवशी राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे समजणार असल्याची माहिती भाजपमधील उच्चपदस्थ सूत्राने दिली.

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली या तीन राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकत भाजपने (BJP) बाजी मारली आहे. तर यावर्षीच्या अखेरीस बिहारमधील निवडणुका होत असून त्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. दुसरीकडे भाजपने संघटनात्मक निवडणूक पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

BJP Flag
BJP vs Shivsena UBT : ठाकरेंनी अमित शहांना दिलेलं आव्हान महाजनांच्या जिव्हारी; म्हणाले, "त्यावेळी तुम्ही झोपला होता का?"

भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे लवकर आता जे. पी. नड्डाच्या जागी राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. मंगळवारी जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी एक बैठक पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह उपस्थित होते. यावेळी या नेत्यांमध्ये तीन तास बैठक पार पडली. बुधवारी सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजपचे संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी पीएम नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संघटनात्मक बदलाना अंतिम स्वरूप दिले असल्याची माहिती सूत्राने दिली.

BJP Flag
Congress News : जुने जाणार, नवे येणार! महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये युवाशक्तीचा उदय होणार?

गुरुवारपर्यंत जवळपास 15 राज्यातील प्रदेशाध्यक्ष ठरले आहेत. 19 एप्रिलपर्यंत उत्तरप्रदेश, कर्नाटक व आंध्र प्रदेशसह पाच ते सहा राज्याच्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 20 एप्रिलपासून नामांकन प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे. याच दिवशी राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे समजणार असल्याची माहिती भाजपमधील उच्चपदस्थ सूत्राने दिली

BJP Flag
Raju Shetti : संजय घाटगेंना भाजपमध्ये घेऊन शक्तिपीठ महामार्गाचा विरोध केला बोथट ; राजू शेट्टींचा सरकारवर निशाणा

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जवळपास सहा नावाची चर्चा आहे. त्यामध्ये एक नाव महाराष्ट्रातील आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, शिवराज सिंग चौहान, मनोहरलाल खट्टर, डी. पुरंदरेश्वरी या ज्येष्ठ नेत्यांची नावे सध्या आघाडीवर असल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता यामधील भाजपच्या अध्यक्षपदी कुणाच्या नावाची वर्णी लागणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

BJP Flag
BJP vs Congress : नागपुरात हिंदूंची घरे जाळली तेव्हा कुठे होता? भाजप आमदार खोपडेंचा काँग्रेसला सवाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com