BJP News: मोदींसह हे चाळीस नेते लोकसभा प्रचाराचा उडविणार महाराष्ट्रात धुरळा

Maharashtra Lok Sabha Election 2024: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत.
Maharashtra Lok Sabha Election 2024
Maharashtra Lok Sabha Election 2024Sarkarnama

Pimpri: देशात लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यात भाजप तथा एनडीए आणि महाराष्ट्रात (Maharashtra Lok Sabha Election 2024) महायुतीने आघाडी घेतली. तशीच ती त्यांनी आता स्टार प्रचारकांची यादी (BJP Star Campaigner) जाहीर करण्यातही बुधवारी (ता.२७) पटकावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) ४० जणांची फौज महाराष्ट्रात भाजपचा प्रचाराचा धुरळा उडविणार आहे.

प्रत्येक पक्षाला आपल्या स्टार प्रचारकांची यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करावी लागते. त्यानुसार भाजपने ती आज महाराष्ट्राची दिली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी ती सादर केली. त्यात मोदी, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे या राष्ट्रीय नेत्यांसह राज्यातील युतीचे तिन्ही पक्षांचे बडे नेते आहेत. महाराष्ट्रातील नितीन गडकरी, नारायण राणे, पीयूष गोयल आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांचा त्यात समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर या राखीव मतदारसंघात इच्छुक असलेले माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांना तेथे संधी नाकारली गेली. त्याची भरपाई त्यांना स्टार प्रचारक करून भाजपने केली. नुकतेच कॉंग्रेसमधून आलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही त्यात स्थान देण्यात आले. उत्तरेतील अभिनेता आणि खासदार रवीकिशन हासुद्धा महाराष्ट्रात येऊन प्रचार करणार आहे. त्यांच्या जोडीला सास भी कभी बहू थी फेम केंद्रीय कॅबिनेट मंत्री पूर्वाश्रमीच्याअभिनेत्री स्मृती इऱाणी आहेत. पक्षाचे ट्रबलशूटर अशी ओळख असलेले राज्यातील कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हेही स्टार प्रचारक म्हणूनही आता भूमिका निभावणार आहेत.

Maharashtra Lok Sabha Election 2024
Sanjog Vaghere Patil: मावळचा गड ठाकरे शिवसेनेकडेच राहील, उमेदवारी जाहीर होताच वाघेंरेंची ललकारी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे. शेजारच्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही राज्यात प्रचाराला येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अजित पवार हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, विजय गावीत, राज्यसभा सदस्य कोल्हापूरकर धनजंय महाडिक हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून प्रचार करणार आहेत.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com