Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, 'जुन्या कॅसेट आता महाराष्ट्रात चालणार नाहीत'

Chandrasekhar Bawankule criticizes Rahul Gandhi and Supriya Sule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्यासह सुप्रिय सुळे यांच्या राजकारणावर टीका केली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली. राहुल गांधी महाराष्ट्रात अराजकता पसरविण्यासाठी आले होते. यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी महाराष्ट्र अशांत करण्याच्या प्रयत्न केला जोता, या विधानाचा आधार घेतला.

"राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन तोंडाच्या वाफा फेकल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांचे बेगडी प्रेम काल दिसले. संविधानाविषयी जो नॅरेटिव्ह सेट केला, ती आता जुनी कॅसेट महाराष्ट्रात चालणार नाही", असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) कालच्या महाराष्ट्र दौऱ्यासह खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या 'एकनाथ शिंदे तुझसे बैर नही, देवेंद्र फडणवीस तुम्हारी खैर नही', या विधानाचा देखील समाचार घेतला. "राज्य सरकारकडून महिला भगिनींचा सन्मान केला जात आहे, म्हणून 'मविआ'कडून खोटारडेपणा पसरवला जात आहे", असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

Chandrashekhar Bawankule
Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवारांनी दिला भडका उडवून; अजित पवारांचं राजकीय भविष्य सांगून टाकलं!

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या माफीनाम्यावर टीकास्त्र सोडले होते. राहुल गांधी यांच्या कालच्या महाराष्ट्र दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. "काँग्रेसला निवडून द्या, खटाखट 8 हजार देऊ म्हणाले होते, पण दिले नाहीत. त्यासाठी त्यांनी काल माफी मागायला पाहिजे होती. राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन तोंडाच्या वाफा फेकल्या. कमलनाथ यांनी मध्यप्रदेशात मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला, त्याचं उत्तर राहुल गांधी देतील का? नेहरूंच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबाबत केलेल्या उल्लेखवर छत्रपतींच्या वंशजांच्या पुरावे मागणाऱ्यांबाबत राहुल गांधी बोलले नाहीत", असे घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधीविरुद्ध केला.

Chandrashekhar Bawankule
Sujay Vikhe : 'दारुड्या स्टेटस ठेवतो अन् गाव बंद होतं'; सुजय विखे, असं का म्हणाले?

'राहुल गांधींचे शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेगडी प्रेम काल दिसून आले. शरद पवार काही दिवसापूर्वी म्हटले होते की, महाराष्ट्र अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत आहे, त्याचा संदर्भ घेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी महाराष्ट्रात अराजकता पसरविण्यासाठी आले होते', असा आरोप केला. महाराष्ट्रात आता राहुल गांधींची जुनी कॅसेट चालणार नाही. संविधानासोबत आता जातीनिहाय जनगणना हिचा कांगावा केला जातोय. हे आता चालणार नाही, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

सुप्रिया सुळेंचं खरं राजकारण समोर आलं

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल महायुती सरकारवर टीका करताना 'एकनाथ शिंदे तुझसे बैर नहीं, देवेंद्र फडणवीस तुम्हारी खैर नहीं', असे विधान केलं होतं. त्याचा धागा पकडत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल खरं राजकारण समोर आल्याचं म्हटलं. "सरकारमधील एकनाथ शिंदे चालतात, पण देवेंद्र फडणवीस यांना खैर नहीं, असा दिलेला इशारा याचा अर्थ आम्हाला कळतो. एकनाथ शिंदे प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री आहेत. पण स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी सुप्रिया सुळे देवेंद् फडणवीस यांना टार्गेट करत आहेत", असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com