BJP Mumbai Chief News : भाजप मुंबईचा सेनापती बदलणार; अध्यक्षपदासाठी 'या' दोघांमध्ये रस्सीखेच

BJP Mumbai leadership News : सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष आहेत. मात्र, आता त्यांच्या जागी नवा अध्यक्ष निवड केली जाणार आहे.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काळात लवकरच जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षानी तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणनीती आखली जात आहे. त्यासाठी मुंबई शहरातील आमदारांची बैठक सोमवारी होत आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे मुंबईचे अध्यक्ष आहेत. मात्र, आता त्यांच्या जागी नवा अध्यक्ष निवड केली जाणार आहे. या बैठकीत मुंबई अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या साठी मुंबईतील दोन आमदारांच्या नावाची चर्चा आहे.

भाजपने (BJP) विधानसभा निवडणुका जिंकलयानंतर महाराष्ट्रात संघटन पर्व अभियान राबवत 1.5 कोटी सदस्य नोंदणी पूर्ण केली आहे. या नव्याने केलेल्या सदस्य नोंदणीचा आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होणार आहे. त्यामुळे आता येत्या काळात संघटनात्मक पातळीवर सध्या भाजपकडून मंडल अध्यक्ष व तालुका अध्यक्षांच्या निवडी होत आहे. आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपकडून संघटनात्मक बांधणी केली जात आहे.

BJP Flag
Rahul Gandhi vs BJP : भाजपविरुद्धच्या संघर्षात काँग्रेसला उभं करण्यातच राहुल गांधींची कसोटी

मुंबईतील कार्यालयात होत असलेल्या या बैठकीस भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिव प्रकाश, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थितीत आहेत. मुंबई अध्यक्ष पदासाठी आमदार प्रवीण दरेकर आणि अमित साटम या दोघांची नावे चर्चेत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला आणि निवडीला विशेष महत्व असणार आहे.

BJP Flag
Uddhav Thackeray News : ठाकरेंनी ‘स्टॅलिन’नीतीचा वापर का केला नाही? कदाचित CM पदाचा राजीनामा अन् पक्षफूटही टळली असती...

सध्या, मुंबईचे अध्यक्षपद सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे आहे. मात्र, आता भाजपने मुंबईचे नेतृत्व नव्या चेहऱ्याकडे देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये, आमदार प्रविण दरेकर आणि अमित साटम यांची नावे चर्चेत आहेत. मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमवेत सोमवारी बैठक सुरु असून भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष ही बैठकीत उपस्थित आहेत. त्याचवेळी प्रविण दरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

BJP Flag
BJP Maharashtra : भाजपमध्ये जबरदस्त कोल्ड वॉर! मुनगंटीवारांना पुन्हा जड जातोय त्यांचाच पठ्ठ्या, सुरू झाला वादाचा नवा अंक

मुंबई महापालिका जिंकायचे मिशन भाजपकडून राबवले जात आहे. त्यासाठी भाजपकडून मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपने नवी रणनीती आखायला सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने भाजपने मुंबईत भाकरी फिरवण्याच्या तयारी सुरू केली आहे. मुंबई अध्यक्षपदासाठी आता नव्या चेहऱ्यास संधी दिली जाणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

BJP Flag
Congress Internal Politics: काँग्रेस नव्या वळणावर! अधिवेशनातील कडू डोस लागू होणार, संघटनात्मक बदल नेत्यांच्या पचनी पडणार का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com