Vasai-Virar Politics : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये नगरसेवक अपात्रतेची लढाई रंगली आहे. भाजपने बहुजनच्या निवडून आलेल्या १६ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच वेळी बहुजन विकास आघाडी कडून भाजपच्या २३ निवडणूक लढविलेल्या उमेदवारांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.या दोन्ही अर्जावर न्यायालयात ५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
वसई-विरार पालिका निवडणूक २०२५–२०२६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या ४३ नगरसेवकांपैकी २३ नगरसेवकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गंभीर कायदेशीर दोष आढळून आलेला आहे, असा आरोप अॅड प्रवीण पाटील यांनी केला असून त्यांनी याबाबत वसई दिवाणी न्यायालयात रीट दाखल केले आहे.
याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, उमेदवारानी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधील पडताळणी उमेदवारांची स्वाक्षरी नसल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. प्रतिज्ञापत्र हा शपथेवर दिलेला दस्तऐवज असून, पडताळणीखाली सही नसल्यास त्या प्रतिज्ञापत्रातील मजकुराची सत्यता उमेदवाराने मान्य केलेली नाही, असे कायद्याने गृहीत धरले जाते. त्यामुळे असे प्रतिज्ञापत्र अपूर्ण,दोषपूर्ण व कायद्याच्या दृष्टीने अवैध ठरते.
5 जानेवारीला संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार वजा हरकत नोंदवलेली होती. तसेच राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे देखील दि. 12/01/2026 रोजी तक्रार सादर करण्यात आली आहे. मात्र त्यावर कोणतेही उत्तर आलेले नाही म्हणून निवडून आलेल्या 23 नगरसेवका विरोधात वसई येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्याकडे निवडणूक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
अपात्रतेसाठी रीत दाखल केलेल्यांमध्ये रीना उमाकांत वाघ (२अ), सान्वी(अश्रीता) संजोग यंदे (२ ब), रवी श्रीगोपाळ पुरोहित (२क), जितेश हरिश्चंद्र राऊत (२ ड), गौरव वसंत राऊत (५ अ), संजना गणेश भायदे (५ ब), दर्शना अनिल त्रिपाठी (५ क), मेहुल अशोक शहा (५ ड), हितेश नरेंद्र जाधव (६ ड), नमिता प्रितेश पवार (११ अ), जितेंद्र मनोहर पाटील (११ ब), रसिका राजेंद्र ढगे (११ क), मनोज गोपाळ पाटील (११ ड), मीरा निकम (१६ ब), बंटी तिवारी (१६ क),
गणेश बाळकृष्ण पाटील (१८ अ), हेमलता सिंग (१८ ब), ख्याती संदीप घरत (१८ क), गंगेश्वरलाल श्रीवास्तव (१८ ड), महेश सदाशिव सरवणकर (२३ ब), निम्मी निपुण दोषी (२३ क), प्रदीप पवार (२३ ड), अपर्णा पाटील (२३ अ) यांचा समावेश आहे.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना विविध प्रकारची माहिती देणे अनिवार्य आहे. असे असताना निवडून आलेल्या बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांनी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करणारी याचिका भारतीय जनता पक्षाचे नितीन ठाकूर यांच्यासह इतर अर्जदारांनी वसईच्या दिवाणी न्यायालयात दाखल केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या वसई विरार महापालिका निवडणूकीत बविआने मित्रपक्षांसोबत ७१ जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. यातील १६ नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना माहिती लपवल्याची माहिती भाजपचे पराभूत उमेदवार नितीन ठाकूर यांनी उजेडात आणली आहे. यामाहितीच्या आधारे त्यांनी वसईतील दिवाणी न्यायाधीश जी. जे. श्रीसुंदर यांच्या न्यायालयात याबाबत रिट दाखल केली आहे.
न्यायालयात रिट दाखल केलेल्या मध्ये आशिष वर्तक, अफीफ जमील शेख, लता कांबळे, संतूर जाधव, ज्योती धोंडेकर, बिना फुटर्याडो, स्वप्निल कवळी, डॉमिनिक रुमाव, लॉरेल डायस, शेखर घुरी, कन्हैया (बेटा) भोईर, अर्शद चौधरी, जयंत बसवंत, दीपा पाटील, आलमगीर डायर व रमेश घोरकना यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.