Narayan Rane : ..'या' प्रकरणी नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाने बजावली नोटीस!

Bombay High Court notice to Narayan Rane : १२ सप्टेंबरपर्यंत म्हणणं मांडण्याची मुदत दिली गेली आहे. ; जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण?
Narayan Rane
Narayan RaneSarkarnama
Published on
Updated on

Vinayak Raut and Narayan Rane News : माजी केंद्रीयमंत्री आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावली गेली आहे. लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या विजयाला ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी आव्हान दिलं आहे.

नारायण राणे(Narayan Rane) यांनी लोकसभा निवडणुकीतील विजय बेकायदेशीर आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मिळवला आहे. असा आरोप विनायक राऊत यांनी न्यायालयात याचिकेतून केला आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ज्यामध्ये नारायण राणे अन् निवडणूक आयोगाला नोटीस बजावली गेली आहे आणि १२ सप्टेंबरपर्यंत म्हणणं मांडण्याची मुदत दिली गेली आहे.

Narayan Rane
Nitesh Rane News : नितेश राणेंनी पुन्हा पोलिसांना धमकावले; म्हणाले, 'तुम्हाला बिर्याणीवाले वाचवायला येणार नाहीत...'

'नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून आणि पैसे वाटून निवडणूक जिंकली आहे. याबाबत तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही. म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील निवडणूक रद्द करावी आणि राणेंना आगामी पाच वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी.' असे विनायक राऊत(Vinayak Raut) यांनी म्हटले आहे.

वकील असीम सरोदे, विनयकुमार खातू, किशोर वरक आणि श्रीया आवले या वकिलांमार्फत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्याविरोधात याचिका दाखल केलेली आहे. तसेच नारायण राणेंना जिंकूण आणण्यासाठी शासकीय यंत्रणेती लोकांचेही सहकार्य होते असा आरोपही केला गेला आहे.

Narayan Rane
Uddhav Thackeray : 1966 चा काळ पुन्हा उभा करायचा..? ठाकरीशैलीत उद्धव यांचा इशारा

शिवसेना(Shivsena) नेते विनायक राऊत यांनी ॲड.असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. विनयकुमार खातू, ॲड.किशोर वरक यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत नारायण राणे व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक जिंकण्यासाठी बेकायदेशीर मार्गांचा वापर केल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांना शासकीय यंत्रणेतील लोकांनी सहकार्य केल्याचा ही आरोप केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com