Bjp : जिल्हा परिषदेला एक सदस्य निवडून येण्याइतकी मतंही तुम्हाला युपीत मिळाली नाही..

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांचा आकडा हा ९ हजार ३५६ म्हणजेच ०.०५ टक्के, तर शिवसेनेच्या उमेदवारांना ३ हजार ७९४ म्हणजेच ०.०२ टक्के मते मिळाली आहेत. (Bjp, Maharashtra)
Shivsena Chief Uddhav Thackeray
Shivsena Chief Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत दिल्लीच्या सत्तेत बसण्याच्या वल्गना करणाऱ्या शिवसेनेला भाजपने चांगलेच सुनावले आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) निवडणुकीच्या मैदानात उतरत प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी जोर लावला होता. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रचार सभा देखील झाल्या. (Maharashtra)

पण आज प्रत्यक्षात जेव्हा निवडणूक निकाल जाहीर झाला, तेव्हा मात्र शिवसेना आणि राज्याच्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला देखील युपीत दखल घ्यावी अशी कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही पक्षाच्या सर्व उमेदवारांचे डिपाॅझीट तर जप्त झालेच, पण या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना मिळालेली मते ही नोटापेक्षाही कितीतरी पट कमी आहेत.

यावरून आता भाजपने विशेषत: शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. जिल्हा परिषद निवडणूकीत एका सदस्याला निवडून येण्यासाठी जितकी मते लागतात, तेवढी देखील तुमच्या उमेदवारांना मिळाली नाहीत, मग तुमचे दिल्लीत बसण्याचे ठिकाण सांगा, असा टोला भाजपने लगावला आहे.

आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीला चिमटा काढला आहे. उत्तर प्रदेशाता भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने देखील युपीतील काही मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. पण ते सगळेच नुसते पराभूतच झाले नाहीत तर त्यांचे डिपाॅझीट देखील जप्त झाले आहे.

यावर ` तुम्हाला, उत्तर प्रदेश मध्ये जेवढी मते मिळाली आहेत, तेवढ्या मताने जिल्हापरिषद सदस्य ही निवडून येत नाही,अशा शब्दात भाजपने टोला लगावला. दुपारी एक वाजताच्या अपडेटनूसार उत्तर प्रदेशात नोटाला १ लाख २१ हजार ३०३ म्हणजे मतदानाच्या एकूण (०.७ टक्के) मते मिळाली आहेत.

Shivsena Chief Uddhav Thackeray
Uttar Pradesh : `युपी में का बा`,चे उत्तर मिळाले, युपी मे फिरसे `बाबा`

तर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांचा आकडा हा ९ हजार ३५६ म्हणजेच ०.०५ टक्के, तर शिवसेनेच्या उमेदवारांना ३ हजार ७९४ म्हणजेच ०.०२ टक्के मते मिळाली आहेत. ही आकडेवारी जाहीर करत भाजपने या दोन्ही पक्षांना आरसा दाखवत `कृपया दिल्लीत बसण्याचे ठिकाण स्पष्ट करा`, असा सवाल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com