Pune News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. त्यातच भाजपकडून काही संघटनात्मक बदल करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी पिंपरीतील अनुप मोरे यांची निवड करण्यात आली. तर दुसरीकडे राहुल लोणीकरांच्या कामाची दखल घेत पक्षाकडून पदोन्नती देण्यात आली. त्यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड करण्यात आली.
रविवारी भाजपचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या निवडीचे पत्र सुपूर्द केले. यावेळी राज्यातील भाजप युवा मोर्चाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यापूर्वी अनुप मोरे यांनी युवा मोर्चाच्या विविध पदावर काम केले आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा राजीनामा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द केलेल्या राजीनाम्यामध्ये सर्वप्रथम प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा कार्यक्षेत्रात अधिकाधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे राहुल लोणीकर यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी खूप मोठी असून संपूर्ण राज्यभरात लक्ष देणे अपेक्षित आहे, अशा परिस्थितीत विधानसभा कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रित केल्यानंतर राज्य पातळीवर आवश्यक तेवढा वेळ देणे शक्य होणार नाही. त्यामुळे राजीनामा स्वीकारण्यात यावा, अशी विनंती त्यांनी पत्रात चंद्रशेखर बावनकुळे यांना केली होती.
त्यानंतर राहुल लोणीकरांच्या कामाची दखल घेत पक्षाकडून त्यांनी राजीनामा दिला असताना त्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी राहुल लोणीकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया राहुल लोणीकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पिंपरीतील अनुप मोरे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या निवडीचे पत्र सुपूर्द केले. यावेळी भाजपचे नेते मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.