Kiren Rijiju On Rahul Gandhi : भाजपच्या किरण रिजिजूंनी गांधी परिवाराचा आरक्षणविरोधी 'डीएनए'च सांगितला...

BJP leader Kiren Rijiju criticizes Rahul Gandhis anti-reservation statement : भाजप नेते केंद्रीय मंत्री किरण रिजिजू मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी राहुल गांधी यांच्या आरक्षणाविरोधी विधानावर टीका केली.
Kiren Rijiju On Rahul Gandhi
Kiren Rijiju On Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात आरक्षणावर केलेल्या विधानावरून भाजपने देशात रान उठवलं आहे.

भाजपचे मंत्री, नेते, पदाधिकारी त्यावर प्रतिक्रिया देत निषेध करत आहेत. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री किरण रिजिजू मुंबई दौऱ्यावर असताना, त्यांनी गांधी परिवाराचा 'डीएनए' हा आरक्षण विरोधी असल्याचा इतिहास सांगत राहुल गांधी यांच्यावर टीका केली

भाजप (BJP) नेते तथा केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आज मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी तिथं माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर केलेल्या विविध विधानांवर त्यांनी भाष्य केले. राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्ष तीव्र आहे. यातच विधानसभा निवडणुका होत असून, त्यातच राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात केलेल्या आरक्षणाच्या विधानावरून काँग्रेसला राज्यात घेरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपने आज राज्यभर राहुल गांधी आणि काँग्रेसविरोधात निषेध आंदोलनं केली.

Kiren Rijiju On Rahul Gandhi
Port Blair New Name : मोठी बातमी : मोदी सरकारने बदलले पोर्ट ब्लेअरचे नाव; अमित शाहांकडून घोषणा

भाजप नेते केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरक्षणावरील विधानावर बोलताना गांधी परिवार आणि काँग्रेसच्या आरक्षणाविरोधी भूमिकेवर निशाणा साधला. किरण रिजिजू म्हणाले, "आरक्षणसंदर्भात कोणीही संभ्रमात राहू नाही. काँग्रेसचा इतिहास राहिला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आरक्षणाला विरोध केला होता. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नसते, तर आरक्षण मिळाले नसते. त्यांच्यानंतर इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ संगळ्यांनाच माहिती आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी, तर लोकसभेत उभे राहून 'ओबीसी' आरक्षणाला विरोध केला होता".

राहुल गांधी देखील एससी-एसटी विरोधात आहे. मतदानांसाठी सर्व काही बोलत असतात. अमेरिकेत त्यांनी चुकन, पण काँग्रेसची आरक्षणविरोधी भूमिका राहुल गांधींनी मांडली. आता अमेरिकेहून आल्यानंतर त्यांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही, असा घणाघात किरण रिजिजू यांनी केला.

Kiren Rijiju On Rahul Gandhi
Ajit Pawar And Supriya Sule : महायुतीत अजितदादा एकटे पडलेत; सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'तो भाजप...'

किरण रिजिजू म्हणाले, "अमेरिकेत त्यांनी आरक्षण संपवण्याचे केलेल्या विधान समोर आलं आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाने संविधानाच्या प्रती हातात घेऊन फिरण्याचे नाटक लोकसभा निवडणुकीपासून सुरू केलं आहे. आता ते सहन करणार नाही. राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षात एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणाचा विरोध त्यांच्या 'डीएनए'मध्ये आहे". राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हा हिंदूविरोधी आहेत. त्यांच्याकडून इतर कोणतीही अपेक्षा करता येणार नाही, असेही किरण रिजिजू यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com