Port Blair New Name : मोठी बातमी : मोदी सरकारने बदलले पोर्ट ब्लेअरचे नाव; अमित शाहांकडून घोषणा

Modi Government Amit Shah Shri Vijaya Puram : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून इंग्रजांच्या काळातील विविध शहरे, इमारती, रस्त्यांची नावे बदलली जात आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअर या शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे शहर अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे. मागील काही वर्षांत पहिल्यांदाच राजधानी असलेल्या शहराचे नाव बदलण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोर्ट ब्लेअरला दिलेल्या नव्या नावाची घोषणा केली. त्यानुसार यापुढे पोर्ट ब्लेअरला ‘श्री विजयपुरम’ असे नाव असेल. हे नाव आपल्या स्वातंत्र्यलढ्यात मिळालेल्या विजयाचे आणि अंदमान-निकोबारच्या त्यातील योगदान दर्शवते, असे शाहांनी म्हटले आहे.

Narendra Modi
Nirmala Sitharaman : राहुल गांधींच्या टीकेनंतर भाजपवर माफी मागण्याची वेळ; काय घडलं सीतारमण यांच्यासमोर?

 अमित शाहांची पोस्ट

अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, देशाच्या गुलामीच्या सर्व प्रतिकांपासून मुक्ती देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव श्री विजयपुरम करण्याचा निर्णय गेतला आहे. हे नाव सातंत्र्यलढ्यातील संघर्ष आणि त्यामध्ये अंदमान-निकोबारच्या योगदान दर्शवते.

आपल्या स्वातंत्र्यलढ्यात आणि इतिहासात अंदमान आणि निकोबार बेटांचे अतुलनीय स्थान आहे. एकेकाळी चोल साम्राज्याचा नौदल तळ म्हणून भूमिका पार पडेले हे बेट आज देशाची सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज आहे, असे शाह यांनी म्हटले आहे.

Narendra Modi
Supreme Court : सुप्रीम कोर्टाने 11 वर्षानंतर पुन्हा CBI ला आठवण करून दिली पिंजऱ्यातील पोपटाची!

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या बेटावरच सर्वातआधी तिरंगा फडकावला होता. तसेच सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांच्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी केलेल्या संघर्षाचे स्थानही हे बेट असल्याचे शाह यांनी नव्या नावाची घोषणा करताना सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com