
Jalgaon Collector News : जळगावच्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना मोठा झटका बसला आहे. मुंबई हायकोर्ट औरंगाबादच्या खंडपीठाने आयुष प्रसाद यांना दोन लाखांचा दंड ठोठावला आणि दंडाची रक्कम त्यांच्या पगारातून वसूल करण्याचे तसेच ती रक्कम एमपीडीए अंतर्गत कारवाई झालेल्या तरुणाला देण्याचे निर्देश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षांत ऊर्फ दादू देविदास सपकाळ हा जुलै २०२४ पासून कोठडीत होता. याच दरम्यान, जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर जुलै 2024 पासून एमपीडए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली, मात्र, त्याला ते आदेश साजर करण्यात आले नाहीत. तो जामीनावर बाहेर आल्यानंतर 10 महिन्यांनी आदेश दाखवण्यात आले. त्यामुळे त्याने कोर्टात धाव घेतली.
औरंगाबाद खंडपीठात यावर सुनावणी न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्यासमोर झाली. व्यक्ती तुरुंगात असताना त्याच्यावर एमपीडीचा वापर करणे हा अधिकाऱ्याचा गैरवापर असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच या एमपीडीचे आदेश मिळेपर्यंत दहा महिन्यांचा कालावधी लोटला.
ज्याच्यासाठी सपकाळ यांच्यावर एमपीडी लावण्यात आला त्याचाशी त्या गुन्ह्याचा काही संबंध नसल्याचे देखील समोर आले. दरम्यान, सरकारकडून ही चूक टंकलेखनामुळे तसेच अनावधाने झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, न्यायालयाने हे स्पष्टीकरण नाकारले.
MPDA या कायद्याचे पूर्ण नाव महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती (अंमली द्रव्यविषयक गुन्हेगार, झोपडपट्टीधारक, हातभट्टीवाले आणि दृक्श्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास प्रतिबंध) अधिनियम, १९८१ असे आहे. या कायद्याद्वारे प्रतिबंधक कारवाई करण्याते येथे जिल्हा दंडादिकारी आणि पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.