Maharashtra Politics Breaking News : मोठी बातमी! मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी नरहरी झिरवाळ यांना तटकरे यांचा फोन

Sarkarnama Headlines Updates 14 December 2024 : आज शनिवार ता. 14 डिसेंबर2024 महाराष्ट्रातील राजकीय ताज्या घडामोडी, नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Narhari Jirwal
Narhari JirwalSarkarnama
Published on
Updated on

Asaduddin Owaisi : मुस्लिम धोक्यात आहेत

खासदार असुद्दीन ओवेसी म्हणाले, देशात मुस्लिमांवर अन्याय होत आहे. देशातील मशिदी आता धोक्यात आल्या आहेत. गोरक्षक मॉब लिंचिंग करत आहेत. गोमांसावरून मॉब लिंचिंग होत आहे. मुस्लिम निवडणुका जिंकू शकत नाहीत. मला विचारले जात आहे की तुमची मशीद 500 वर्षांपूर्वी अस्तित्वात होती की नाही. मुस्लिमांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उत्तर प्रदेश सरकारकडून संविधान पाळले जात नाही

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी सभागृहात संविधानावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हातरस बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे योगी सरकारही राहुल यांच्या निशाण्यावर होते. राहुल म्हणाले, चार वर्षांपूर्वी हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार झाला होता. पीडित कुटुंब तुरुंगवास भोगत असताना गुन्हेगार बाहेर फिरत आहेत, असे घटनेत कुठे लिहिले आहे? मनुस्मृती यूपीमध्ये लागू आहे, संविधान नाही.

विष्णू चाटे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून विष्णू चाटे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेंमार्फत खंडणी मागितल्याचा चाटे यांच्यावर आरोप होता. या प्रकरणी गुन्हा दखल झाल्यानंतर चाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. बीड जिल्ह्यात पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याने विष्णू चाटे यांच्यावर पक्षाने केली कारवाई

पराभवाची जबाबदारी सगळ्यांची - नाना पटोले

विजय वडेट्टीवार यांनी प्रदेशाध्यक्षांनी लोकसभेतील विजयाची जबाबदारी घेतली होती. आत्ता पराभवाची जबाबदारी देखील त्यांचीच असल्याचे म्हटले होते. यावर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी निवडणूक सगळ्यांनी मिळून लढवली होती. पराभवाची जबाबदारी सगळ्यांची आहे. पराभव हा श्रेयवादाचा भाग नाही तो आत्मचिंतनाचा भाग आहे, असे देखील नाना पटोले म्हणाले.

राजू पाटलांनी घेतली CM फडणवीसांची भेट

मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. सोमपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस उद्यापासून नागपूरमध्ये असतील. त्यापार्श्वभूमीवर फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नेते येत आहेत.

Lal krishna Advani : लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवानी यांचे वय सध्या ९७ वर्ष असून गेल्या ५ महिन्यांत त्यांना चौथ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून अडवाणी यांच्यावर उपचार सुरू

Shivsena UBT : महाआरतीमध्ये संजय राऊत, उद्धव ठाकरे सहभागी होणार

दादरमधील हनुमान मंदिर पाडण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले की, आज (शनिवारी) संध्याकाळी हनुमान मंदिरात हजारो शिवसैनिक महाआरती करतील. या महाआरतीला मी स्वतः आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com