Maharashtra Political Updates: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील 10 जानेवारी 2025 च्या दिवसभरातील सर्व राजकीय आणि प्रशासकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama
Published on
Updated on

राजकारणात मोठी खळबळ! अमरावतीत भाजप आणि राणांची युती तुटली

भारतीय जनता पक्ष आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची अमरावती महानगरपालिका निवडणुकीत युती झाली होती. मात्र आता मतदानाला काही दिवस शिल्लक असतांना ही युती तोडण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने ज्या 6 जागा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला दिल्या होत्या त्या 6 ही जागांवर भारतीय जनता पक्षाने अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी दिली आहे. त्यामुळे अमरावतीचा राजकारणात खळबळ उडाली आहे

मटण वाटायचे आणि मतदान घ्यायचे ही काँग्रेसची परंपरा; आ.हेमंत पाटील यांची टीका

भाजप हिंदुत्ववादी पक्ष, शिस्तीचा पक्ष, अश्या पक्षाने मटणाचा प्रचार करणे कितीपत शिस्तीत बसते असा सावला शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी उपस्थित केलाय. रोज खा मटण आणि कामळावर दाबा बटण असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी केले होते. त्यावरून आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसची जी परंपरा आहे मटण वाटायची आणि मतदान घ्यायची ही परंपरा अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये आणलीये. नांदेडची भाजप काँग्रेसमय झालीये अशी टिकाही हेमंत पाटील यांनी केली.

अशोक चव्हाण मुक्त नांदेडचा शिवसेनेचा नारा

शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण मुक्त नांदेडचा नारा दिला आहे. महापालिकेत शिवसेना-भाजपची युती होऊ शकली नाही. अशोक चव्हाण यांचीच तशी इच्छा नव्हती असा आरोप शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी केला होता. अशोक चव्हाण मुक्त नांदेड करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आहे. यावर अशोक चव्हाण यांनी मात्र 'मी नांदेडचाच रहिवाशी आहे, इथेच जन्मलो अन् इथेच मरणार, त्यामुळे नांदेड अशोक चव्हाण मुक्त होईच शकत नाही' अशा शब्दात शिवसेनेला प्रत्युत्तर दिले.

भाजपचा बदलापूरमध्येच आणखी एक पराक्रम, दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपीला केला उपनगराध्यक्ष

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे याला स्वीकृत नगरसेवक बनवल्याने भाजपवर राज्यभर जोरदार टीका होत आहे. या टीकेनंतर आता आपटे याचा राजीनामा घेण्यात आला असून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. मात्र याच नगरपालिकेत भाजपचा आणखी एक पराक्रम समोर आला असून उपनगराध्यक्षपदी प्रियांका दामले यांची निवड झाली आहे. दामले यांच्यावर दंगल घडवल्याचा आरोप असून सध्या त्या जामीनावर बाहेर आहेत.

भाजपने राज्यातलं राजकारण नासवून टाकलं : माजी मंत्री बाळासाहेब थोरात.

भाजपने राज्यातलं राजकारण नासवून टाकलं, अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राजकारणाचा बट्टयाबोळ कोणी केला आहे, कशा पद्धतीच्या तडजोडी सुरू आहेत, यावर आता जनतेनेच त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत असेही त्यांनी म्हटलं आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीचा गोंधळ पाहायला मिळत असून निवडणूक कोणत्या पातळीवर गेली आहे, याचीही उदाहरणे पाहायला मिळत असल्याचे ते म्हणाले. ते सांगलीमध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेच्या निमित्ताने बोलत होते.

एमआयएमला हाकलून द्या; नाहीतर...; शिवसेना आक्रमक

परळी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. मात्र गटनेता निवडीच्या प्रक्रियेत शिवसेनेला विश्वासात न घेता एमआयएमच्या नगरसेवकाला गटात घेतल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत संतापाचे वातावरण आहे. एकतर एमआयएमला गटातून हाकलून द्या, अथवा आम्हाला या गटातून बाहेर पडण्याची परवानगी द्यावी, अशी भूमिका शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी मांडली.

महिलांसाठी पीएमपीएल आणि मेट्रो प्रवास मोफत करण्याच्या दादांच्या घोषणेवर चंद्रकांतदादांची जोरदार टीका 

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात महिलांसाठी पीएमपीएल आणि मेट्रो प्रवास मोफत करण्याच्या घोषणेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी अजितदादांना प्रश्न उपस्थित करताना, 'एवढा मोठा आर्थिक निर्णय कॅबिनेटमध्ये चर्चा न करता परस्पर कसा घोषित करता? ही तुमची वैयक्तिक तिजोरी आहे का?' असा तिखट सवाल केला आहे.

Nitesh Rane : मराठवाडा, विदर्भाप्रमाणे कोकणाला निकष नको

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळा बंद होऊ नयेत, आणि कोकणासाठी निकष वेगळे लावा हा माझा आग्रह आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आपल्या जिल्ह्याच्या गावागावातील शाळा बंद होता कामा नये आणि शासन म्हणून आमचा प्रयत्न असेल की जे निकष मराठवाडा, विदर्भाला आहेत, ते कोकणाला नको यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Bjp News : भाजपच्या आमदारावर केले आरोप

ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होत आहे. त्यातच, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथे मोठी घडामोडी घडली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला धक्का दिला आहे. तीन माजी नगरसेवकानी प्रवेश केला आहे. या तीन माजी नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळीस, भाजप नेते तथा आमदार नरेंद्र मेहतांवर या तीन माजी नगरसेवकांनी आगपाखड केली आहे.

भाजपच्या तुषार आपटेचा स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा

 बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या आदेशानंतर वरिष्ठांकडे त्यांनी आपला राजीनामा दिला.

Harshwardhan Sapkal : कुंभमेळ्याचा पैसा पक्ष फोडीसाठी? गिरीश महाजनांवर सपकाळांचा गंभीर आरोप

गिरीश महाजन यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. गिरीश महाजन कुंभमेळ्याचे बजेट विरोधी पक्ष फोडाफोडीसाठी वापरतात असा अत्यंत गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पुण्यामध्ये बोलताना केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही सडकून प्रहार केला.

उपमुख्यमंत्री शिंदे आज नाशिकच्या मैदानात

नाशिक महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असून, दोन्ही ठाकरे बंधूंची सभा शुक्रवारी पार पडल्यानंतर आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (ता. १०) नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात उतरत आहेत. ठाकरे बंधूंवर हल्लाबोल करण्याची व सत्तेसाठी नाशिककरांना भावनिक साद घालण्याची रणनीती त्यांनी आखली आहे.

गणेश नाईकांचा टांगा पालटी करू - शंभूराज देसाई

गणेश नाईकसाहेब शिंदेंसाहेबांचा टांगा पलटी करण्याचे बोलत आहे. शिंदेसाहेब लांब राहिले पण आम्ही कार्यकर्तेच नाईकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार करू, असे आव्हान मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री नाईकांना दिले.

रमनसे बदलापूरात मोर्चा काढणार

मनसे भाजपविरोधात बदलापूरमध्ये मोर्चा काढणार आहे. ⁠लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेचे स्वीकृत नगरसेवक पद रद्द करा, अशी मागणी मनसेने केली आहे.मनसे नेते अविनाश जाधव यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.

अजितदादांना सत्तेतून बाहेर काढा:  हर्षवर्धन पाटील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सत्तेतून बाहेर काढावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Jalna News: जालन्यात 98 लाखांची रोकड जप्त

जालना शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने शहरात आदर्श आचारसंहिता लागू आहे. प्रशासकीय यंत्रणा अत्यंत सतर्कतेने काम करीत आहे. जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर चौफुली टोलनाका येथील स्थितिक सर्वेक्षण पथकाने शुक्रवारी दुपारी कारवाई करत एका वाहनातून 98 लाखांची बेकायदा रोख रक्कम जप्त केली आहे.

ठाकरे सेनेला मुंबईत मोठा धक्का

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. अंधेरी पूर्व येथील ठाकरे सेनेचे उपविभाग प्रमुख असलेले अशोक मिश्रा यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी आपल्या समर्थकांसह वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. बीएमसी निवडणुकीतील तिकीट वाटपावरून मिश्रा हे नाराज होते.

उमरगा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजय वाघमारे बिनविरोध

उमरगा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजय वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या नगरपालिकेत शिवसेनेचे किरण गायकवाड हे नगराध्यक्ष आहेत तर काँग्रेसचे विजय वाघमारे यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

दररोज नळाद्वारे पाणी हे अशक्य नाही - अजित पवार

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्रित जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवारांनी शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवणं अशक्य नाही असं म्हटलं. शिवाय दररोज नळाद्वारे पाणी देणं हे शक्य असल्याचं ते म्हणाले. तसंच ट्रॅफिकची समस्या सुधारण्यासाठी आमचे पक्ष काम करणार आहे, असंही अजित पवार म्हणाले.

NCP : अजित पवार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्रित जाहीरनामा जाहीर

पुण्यात राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्रित जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे.

शनिशिंगणापूरला संकटग्रस्त आणि भाजपमध्ये इडी, सीबीआयग्रस्त जातात - उद्धव ठाकरे

शिवसेना आणि मनसेचे संयुक्त सभा नाशिक महापालिका निवडणुकीसाठी झाली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. भाजपच्या नशिबी काय जीवन आले आहे? आमच्याकडे असल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. भाजपमध्ये घेण्यासाठी अगदी सलीम कुत्ता, बिल्ली, उंदीर काहीही चालते. आमदार देवयानी फरांदे या बाहेरच्या लोकांच्या प्रवेशावर रडल्या. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपची तुलना शनिशिंगणापूरशी केली. मात्र शनिशिंगणापूरला संकटग्रस्त जातात. भाजपमध्ये इडी, सीबीआयग्रस्त जातात, असं ठाकरे म्हणाले.

Sangli crime : सांगलीत ऐन निवडणुकीच्या धामधुमीत एकाची निघृण हत्या

सांगलीतील शामरावनगरमध्ये रात्री साडे अकराच्या सुमारास चेतन आप्पासाहेब तांदळे (वय १८) या युवकाचा निघृण हत्या करण्यात आली आहे. चेतन हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र महापालिका निवडणुकीतील एका उमेदवाराच्या कार्यालयासमोर हा खून झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आज बीड-सोलापूर-पुणे दौऱ्यावर

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड, सोलापूर, पुणे दौऱ्यावर आहेत. निवडणुकीच्या प्रचरासाठी मुख्यमंत्री आज सभा घेणार आहेत.

हिंदुत्वाच्या नावाखाली ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मतदान करू नका - आमदार नितीन देशमुख

अकोल्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रचार सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. हिंदुत्वाच्या नावाखाली बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना मतदान करू नका. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो, असे सांगणारे शिंदें आज एमआयएम सोबत बसलेत. तर तिकडे अकोटमध्ये भाजपने 'एमआयएम'ला सोबत घेतलंय, हेच तुमचं हिंदुत्व का? असा सवाल नितीन देशमुख यांनी प्रचार सभेतून केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com