

महानगरपालिका निवडणूक मतदानापूर्वी संभाजीनगरमध्ये तुफान राडा झाला आहे. निवडणुकीवरून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावात ही घटना घडली. दोन उमेदवारांचे समर्थक आमने-सामने आल्यानं हा प्रकार घडला. दोन-तीन जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
सरसंघचालक मोहन भागवत हे सकाळी नागपूरच्या संघ मुख्यालयाचे मागे असलेल्या नाईट स्कूल येथे सकाळी 7.30 वाजता मतदान करणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महाल परिसरातील न्यू इंग्लिश स्कूल येथे सकाळी 9.45 च्या सुमारास मतदान करणार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब धरमपेठ त्यांच्या निवासस्थान परिसरात आरोग्य केंद्रातील मतदान केंद्रावर सकाळी 10.30 वाजता मतदान करणार
गडकरी यांची वेळ सारखी असल्यास मुख्यमंत्रीकडे जावे लागतील
काँग्रेस नेते आमदार सतेज सकाळी 8.45 वाजता मतदान करणार आहेत
मतदान केंद्र यशवंतराव भाऊराव पाटील विद्यामंदीर, कसबा बावडा, शाहू जन्मस्थळ, डॉ. डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज शेजारी
भाजप खासदार धनंजय महाडिक मार्केट यार्ड मतदान केंद्रावर सकाळी 9.30 वाजता मतदान करणार
खासदार शाहू महाराज छत्रपती सकाळी 10 वाजता न्यू पॅलेस मतदान केंद्र इथ मतदान करणार
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काळात नवी मुंबईतील वातावरण चांगलंच तापलंय असून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज पहाटेच्या वेळी घडली असून उपस्थित पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. तसेच दोनही गटांना बाजूला करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांच्या मतदानाला अवघे काही तास उरलेत मात्र अद्यापही राष्ट्रवादी शरद पवार गटातला गोंधळ काही संपला नसल्याचे समोर आले आहे . पॅनल क्रमांक चार ड मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रामदास वळसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे . गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचा प्रचार देखील सुरू होता मात्र काल दुपारच्या सुमारास अचानक सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा उबाठाच्या उमेदवाराला असल्याचे पत्र काढलं हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले. त्यामुळे मतदानाला काही तास उरलेले असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मात्र गोंधळलेले असलेले पाहायला मिळत आहे.
राज्याच महापालिका निवडणुकींची रणधुमाळी सुरू असून उद्या मतदान होणार आहे. त्याआधी राज्यात विविध ठिकाणी मतदारांना पैसे वाटण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर २० येथे पैशाने भरलेल्या बॅगा सापडल्या असून संशयीतावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या कोणत्या पक्षाचे पैसे होते याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
कल्याणच्या भोईरवाडी परिसरात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. निवडणूक प्रचारादरम्यान स्लिप वाटपाच्या कारणावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की तब्बल अर्धा तास रस्त्यावरच गोंधळ सुरू होता. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाला एक रात्र बाकी असून त्या आधीच येथील राजकीय वातावरण तापले आहे. येथील प्रभाग क्रमांक दोन मधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ऋषिकेश पाटील यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. घरावर दगडफेक करत खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. तर भाजपच्या उमेदवारासह गुंडांनी हल्ला करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी केला आहे.
धुळ्यात 500 हून अधिक मतदान कार्ड एकाच कार्यकर्त्याकडे आढळून आल्यानंतर एमएम पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे सर्व मतदान कार्ड ताब्यात घेऊन. धुळे महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी नितीन कापडणीस यांची भेट घेऊन त्यांच्या टेबलावरच हे सर्व ताब्यात घेतलेले मतदान कार्ड ठेवून या सर्व प्रकाराची माहिती दिली आहे. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात पोस्ट कार्यालयातून थेट मतदारांच्या घरापर्यंत पोहोचविले जाणारे सीलबंद मतदान कार्ड आले कुठून असा प्रश्न एमआय पक्षाचे पदाधिकारी ईर्षात जहागीरदार यांनी विचारला आहे.
वाशिममध्ये गोगरी परिसरात मनरेगा योजनेच्या अंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याबाबत शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला असून आता काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी, या अन्यायकारी अन्नदात्याविरोधी फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो. या शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे म्हटले आहे.
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अनुषांगाने पुणे शहरामध्ये 14 जानेवारी 2026 रोजी मतपेटी वाटप, 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका हद्दीत विविध क्षेत्रिय कार्यालय, शाळा, महाविद्यालय येथे संभाव्य होणारी गर्दी तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागांतर्गत विविध रस्त्यावर वाहतूक कोंडी होवू नये. तसेच वाहतूक सुरळीत तसेच सुरक्षित राहण्यासाठी 14 जानेवारीपासून ते 16 जानेवारीपर्यंत वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
पक्ष,तिकीट वाटप,पक्ष बदल इ. यावर गाण्याच्या माध्यमातून भाष्य केले आहे
ज्या कोणाला कोणत्याही पक्षाचं तिकीट मिळालं नाही, चिंता करू नका पीएमपीएल आहेच...
पीएमपीएल पक्षाचे तिकीट आता ऑनलाईनही उपलब्ध आहे..
आता रांगेत उभा राहायची गरज नाही, पीएमपीएलला प्राधान्य द्या
राजकीय तिकीट नाही पण बसच तिकीट पक्क.. त्यांना आम्ही थेट बसच तिकीट देतो
वेळेवर बसl,आरामदायक प्रवास आणि कमी ताण हे आमचं आश्वासन
पीएमपीएलने निवडा,मत नको,तिकीट पुरे..पक्ष बदल नाही फक्त थांबे बदल.. पीएमपीएल सोबत सुरक्षित प्रवास करा..
सुज्ञ मतदार नागरिकांना आपला योग्य उमेदवार निवडा १५ जानेवारीला तारखेला मतदानाचा हक्क बजावा ....
पुणे महापालिका निवडणूकीत शहरात आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी केली कारवाई
महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये 179 केसेस दाखल करुन त्यामध्ये 1 कोटी 23 लाख 90 हजार 50 रुपये इतका किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यामध्ये अंमली पदार्थ कायदयान्वये 126 ग्रॅम एमडी, 3 किलो 947 ग्रॅम गांजा, 7 किलो 286 ग्रॅम नार्कोटिस्क पिल्स, 212 टॅबलेट, 57 ग्रॅम 780 मिलीग्रॅम चरस असा एकण 26 लाख 84 हजार 729 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चिपळूण मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का
नगरपंचायत निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार रमेश कदम यांनी राजीनामा दिला आहे.
नगरपंचायत निवडणूकीत झाला होता पराभव रमेश कदम यांच्या जिव्हारी....
पक्षात किंमत नसल्याची खंत व्यक्त करत दिला राजीनामा
आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी समोर असताना कदम यांच्या राजीनाम्याने पक्षाला धक्का बसला आहे.
नगर पालिका निवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादी आणि भाजपची युती होऊन शिवसेना बाहेर राहणार असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिले आहेत.
अलिबागमध्ये पत्रकारांशी बोलताना सुनिल तटकरे यांनी शक्यता वर्तविली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 14 पोलीस उपायुक्त, 30 सहाय्यक पोलीस आयुक्त, सात परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस आयुक्त, 166 पोलीस निरीक्षक, 723 सहाय्यक पोलीस निरीक्षक, बारा हजार पाचशे पोलीस उपनिरीक्षक, 3250 होमगार्ड आणि एस आर पी एफ च्या चार तुकड्या असा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
निवडणुकीच्या वादातून मालेगावमध्ये एमआयएमच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आला. मालेगावमधील मुंबई-आग्रा महामार्गावर काल रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पोलिंग एजंटच्या कामासाठी जाऊन परत येत असताना प्रभाग क्रमांक ४ मधील एमआयएमचे उमेदवार विशाल अहिरे यांच्यावर हल्ला करण्यात आला.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी बिनविरोध निवडणूक आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती, ही याचिका कोर्टाने फेटाळले आहे.
पुणे महानगरपालिकेसाठी उद्या मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून मतपेट्या आणि मतदान साहित्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. शहरातील एकूण 4 हजार 11 मतदान केंद्रांवर मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य पाठवले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. कालच आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती.
मतदारांना पैसे वाटण्यावरून भाजप आणि शिवसेनेते मोठा राडा झाला. भाजप उमेदवाराचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर आणि शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र शिवसेना उमेदवार नितीन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शिवसेना उमेदवारांना अटक करण्याची मागणी करत आंदोलन केले होते या मागणीनंतर मध्यरात्री पोलिसांनी रवी पाटील आणि नितीन पाटील त्यांचा उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातून यांना ताब्यात घेतले.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मतदानाच्या आधीच्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती आणि आता मुंबई महापालिका निवडणुकीत प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्यास परवानगी दिली. अशा प्रकारचा निर्णय हा पहिल्यांदाच होत असून हा निर्णय म्हणजे घरोघरी जाऊन लक्ष्मीदर्शनासाठी दिलेली अधिकृत मंजुरीच आहे. यावरुन कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासासाठी भाजप आणि निवडणूक आयोग यांच्यात साटंलोटं झाल्यांचं दिसतंय, पण स्वाभिमानी मतदार हा डाव नक्की हाणून पाडतील, असा विश्वास आहे, असे ट्विट रोहित पवारांनी करत भाजपवर टीका केली.
"आपण निवडणूक नव्हे तर गद्दार आणि भ्रष्टाचाराच्या वृत्तीविरोधात लढतोय. आपली मराठी अस्मिता मारण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्या भाषेवर आक्रमण होत आहे. ही गद्दारी आणि महाष्ट्रद्रोही वृत्ती असून या वृत्तीचा पराभव करण्यासाठी मशालीला मत द्यावे लागेल. निवडून दिलेले गद्दार निघतात, मात्र, निवडून देणारे कधीही गद्दार नाहीत, हे दाखवणारी ही निवडणूक आहे," असं भावनिक आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि मतदारांना केलं आहे.
पूजा खेडकरच्या बंगल्यावर दरोडा प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलिसांनी मुंब्रातून एकाला अटक केली आहे. खुम्मा दिलबहादुर शाही (वय ४० रा. कौशल मुंब्रा जि.ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी उमेदवार प्रतिनिधींची बैठक घेणार असून ते यावेळी उमेदवारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर या बैठकीनंतर राज ठाकरे मुंबादेवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात 30 लाख मतदार हक्क गाजवणार आहेत. या निवडणुकीसाठी 3605 मतदान केंद्र असणार आहेत. पुणे जिल्हा परिषद च्या 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 गणासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 29 लाख 76 हजार 454 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
पनवेल महानगरपालिका प्रभाग 17 मध्ये भाजप कार्यकर्त्यांना पैसै वाटप करताना मनसे कार्यकर्त्यांनी पकडल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर भाजपकडून मतदारांना पैसे वाटप केली जात असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.