महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचा निकाल स्पष्ट झाला असून राज्यातील 24 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
मुंबई -
मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीने बहुमताचा टप्पा पार केला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड -
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने आपली सत्ता आणली आहे.
नागपूर -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ल्या असलेल्या नागपुरात भाजपने आपली एकहाती सत्ता आणली आहे.
ठाणे : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने आपले गड राखलेत.
संभाजीनगर : भाजप येथे पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून एमआयएमने दुसऱ्या क्रमांकावर आहे.