Maharashtra Political Updates: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Sarkarnama Headlines Updates : मंत्री तानाजी सावंतांविरोधात गुन्हा दाखल करा, तुळजापुरातील पुजारी आक्रमक झाले आहेत, यासह देशासह राज्यातील 9 जानेवारी 2025 च्या दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

शिवसेना नेते विनोद घोसाळकरांचा मुलगा सौरभ घोसाळकर  निवडणुकीच्या मैदानात

मुंबईच्या दहिसर प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेना नेते विनोद घोसाळकर यांचा मुलगा सौरभ घोसाळकर हा महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत असून पक्षाची कामे वडिलांनी नगरसेवक आमदार म्हणून केलेली कामे, भाऊ दिवंगत अभिषेक घोसाळकर यांनी केलेल्या कामाच्या जोरावर 16 तारखेला विजय आमचा होईल असा विश्वास सौरभ घोसाळकर यांनी व्यक्त केला आहे.शिवाय ही लढत बाहेरील उमेदवार विरुद्ध दहिसरचा मुलगा यांच्यात होणार आहे. 16 तारखेला निकाल लागेल तेव्हा मराठी माणसाचा भगवा महापालिकेवर फडकेल असं म्हटलं आहे.

Eknath Shinde : तब्बल 17 अपक्ष उमेदवारांचा पाठिंबाही जाहीर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकाला आधीच धडाका लावला आहे. लातूर महापालिका निवडणुकीमध्ये उभे असलेल्या तब्बल 17 अपक्षांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि पक्षात प्रवेशही केला आहे. शिंदे यांनी पक्षाच्या वतीने सर्वांचे स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारासाठी ही निवडणूक सोपी झाल्याची चर्चा आहे.

Devendra Fadnavis : लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचा दावा

नालासोपाऱ्यातील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, 'आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, असे म्हणत थेट विरोधकांना आव्हान दिले आहे. महायुती सरकारला एक वर्ष होऊन गेलं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि काळजी करू नका हा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे. त्यामुळे ही योजना सुरूच राहील कधीच बंद होणार नाही.

Gokul Dudh : गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचा शिंदेसेनेत प्रवेश?

कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. विशेषतः काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिंदेसेनेची ताकद वाढणार असून आगामी राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबईत खळबळ! निवडणुकीच्या रणधुमाळीत कारमध्ये सापडले लाखोंचे घबाड

राज्यात १५ जानेवारी रोजी २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक जाहीर झाल्यापासून निकाल लागेपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू केली जाते. या काळात नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाते. अशातच नवी मुंबईत आचारसंहिता लागू असताना एका कारमधून तब्बल १६ लाख १६ हजार रुपयांची रोकड सापडली आहे. ही रक्कम नेमकी कशासाठी होती, याचा पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत.

छाया खंडागळे आज भाजपात प्रवेश करणार

अंधेरीत आठवलेंच्या आरपीआयला मोठा धक्का. छाया खंडागळे आज भाजपात प्रवेश करणार.

Eknath Shinde News : एकटे लढत असलो तरी कमी समजू नका...

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कात्रज येथे सभा घेतली. शिवसेना एकटी लढत असली तरी कमी समजू नये, असा इशारा शिंदे यांनी या सभेत विरोधकांना दिला.

Congress-VBA update : काँग्रेस-वंचितची मुंबईत सभा

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची मुंबईत एकत्रित सभा होणार असल्याची माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली. ठाकरे बंधूंचे मुंबईत ग्लॅमर असले तर आम्ही लोकांमध्ये जाऊन काम करतो, असा टोलाही गायकवाड यांनी लगावला आहे.

BMC Election : भाजप-शिवसेनेचा जाहीरनामा उद्या

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीचा जाहीरनामा उद्या प्रसिध्द केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिध्द केला जाणार असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधूंनी वचननामा प्रसिध्द केला आहे.

Mahapalika Election : निलेश भोजने यांना निवडणूक लढविण्यास परवानगी

नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ अ मधून निवडणूक लढविण्यास निलेश भोजने यांना मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी भोजने यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला होता. ते भाजपचे उमेदवार होते. त्याविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने भोजने यांना दिलासा देत निवडणूक लढविण्याची परवानगी दिली आहे.

Yashomati Thakur : यशोमती ठाकूर यांनी अशोक चव्हाण यांचा 'आदर्श चव्हाण' म्हणून केला उल्लेख...

काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मतदारांची किंमत त्यांनी मटणापूरती केली आहे, ही मतदारांची सुद्धा किंमत घटवणारी गोष्ट आहे, आम्ही त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. अशोक चव्हाण यांनी स्वतःची किंमत कमी करून घोटाळे केले. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले, त्यांना त्यांच्या वडिलांची प्रतिमा सुद्धा लक्षात नाही, असा टोला ठाकूर यांनी लगावला.

Gondiya Update : गोंदियातील खडकी इथं बिबट्याचा थरार; चार वर्षांच्या चिमुकलीला नेलं उचललं

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) इथं आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बिबट्याने चार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याला घरातून उचलून नेलं. या हल्ल्यात त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले (वय चार), असे आहे.

Beed Politics : अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षाच्या जावयावर उधळल्या नोटा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

बीड नगरपालिकेतील अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांच्या जावयावर पैसे उधळण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी पारवे, या निवडून आलेल्या आहेत. बीड शहरात आयोजित एका कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान मुजीब शेख यांच्यावर पैशाच्या नोटा उधळण्यात आल्या. नगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रेमलता पारवे यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र प्रचार करत असताना मुजीब शेख यांच्या सासू आहेत असा प्रचार करण्यात आला होता. विशेष म्हणजे सर्व नगरपालिका निवडणुकीत मुजीब शेख यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याकडून अशा पद्धतीने पैशाची उधळण केल्याने चर्चेला उधाण आले आहे. तर सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Ajit Pawar Sangli : अजित पवार यांच्या सांगली सभेत गोंधळ

सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हद्दपार केलेला, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आझम काझी याच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर घोषणाबाजी करून लक्ष वेधले. उमेदवार आझम काझी याचा समर्थक मतीन काझी व अन्य चार हद्दपार गुन्हेगारांनी समर्थकांसह घोषणाबाजी आणि पोस्टरबाजी करत गोंधळ घातला व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधून घेतले.

Sangli Politics : अजितदादांनी सकाळच्या सभेमुळे गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली महापालिकेसाठी सकाळी प्रचार सभा घेतली. या सभेमुळे गैरसोय झाल्यामुळे दिलगिरी व्यक्त करत, पाच वर्षाकरिता माझ्या मतदार बंधूं-भगिनींना निर्णय घ्यायचा आहे. तो योग्य घ्यावा, असं आवाहन केले. तसंच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुढच्या आठवड्यात जाहीर होत आहेत, असे सांगून त्याचीही देखील तयार करण्याचं आवाहन केलं.

ShivsenaUBT : 'आश्वासनांची गाजरं देण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी रस्ते घोटाळ्याच्या चौकशीच काय झालं ते सांगावं'

महापालिकेने अहिल्यानगर शहरात केलेल्या शहरातील 778 रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. ठाकरे शिवसेनेने त्याच्या चौकशीची मागणी करून सहा महिने झाले. तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही न करता भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालण्याचे काम केले आहे. मनपा निवडणुकीसाठी अहिल्यानगरकरांना आश्वासनांची गाजरं देण्या पेक्षा घोटाळ्याच्या चौकशीचे काय झाले, हे अहिल्यानगरकरांना आधी सांगावे, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी लगावला आहे. जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, उपजिल्हाप्रमुख दीपक भोसले, ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उपशहर प्रमुख सुनील भोसले, उपशहर प्रमुख मनोज गुंदेचा, युवा सेनेचे आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे उपस्थित होते.

Amravati Plitics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमरावतीत तोफ धडाडणार

उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर अजून, महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी अजित पवारांची प्रचार सभा होणार आहे. दुपारी चार वाजता संत गाडगेबाबा समाधी मंदिर समोरील प्रांगणात ही सभा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता अजित पवारांची अमरावती जाहीर सभा होत आहे.

नाशिकमध्ये आज ठाकरे बंधुंची पहिली संयुक्त सभा होणार

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांची नाशिकमध्ये आज पहिली संयुक्त सभा होणार आहे. खासदार संजय राऊत यांच्यासह मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी या सभेसाठी नाशिकमध्ये येणार आहेत.

सांगली जिल्हा बँकेच्या झरे शाखेत चोरी, कोट्यावधींचा ऐवज लंपास

सांगलीतील झरे (ता. आटपाडी) येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत अज्ञात चोरट्यांनी कोट्यवधींचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मंगळवारी मध्यरात्री खिडकी कापून करण्यात आलेल्या चोरीमध्ये सुमारे ९ किलो सोने, २५ किलो चांदी व रोकड असा कोट्यावधींचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राजमाता जिजाऊचा जन्मोत्सव चार दिवसांवर तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष

राजमाता जिजाऊंच जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथे दरवर्षी 12 जानेवारीला जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. हा जन्मोत्सव आता चार दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी या ठिकाणी एकही आढावा बैठक घेतली नसून सिंदखेड राजा येथे जिजाऊ भक्तांसाठी कुठल्याही सोयी सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे यांनी केला आहे. बुलढाणा जिल्ह्याला दोन पालकमंत्री देण्यात आले आहेत. जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला देशभरातून लाखो भाविक हे सिंदखेडराजा येथे येत असतात मात्र त्यांच्यासाठी कुठल्याही सोयी सुविधा न पुरवता व कुठलीही आढावा बैठक न घेतल्याने आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.

Vishwajit Kadam : एमआयएम युतीमुळे भाजपचा खरा चेहरा समोर आला - विश्वजीत कदम

एमआयएमसोबतच्या युतीमुळे भाजपचा खरा आणि दुटप्पी चेहरा समोर आला असं म्हणत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपवर टीका केली. अकोल्याचा अकोट महानगरपालिकेत भाजपा आणि एमआयएमने केलेल्या युतीवरून त्यांनी ही टीका केली.

मुंबई भाजपकडून बंडखोरांचे सहा वर्षांसाठी निलंबन

भाजपकडून मुंबई महापालिकेत अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी करणाऱ्या २६ जणांचे ६ वर्षांसाठी निलंबन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हे निलंबन निलंबन करण्यात आलं आहे.

मंत्री तानाजी सावंतांविरोधात गुन्हा दाखल करा, तुळजापुरातील पुजारी आक्रमक

शिवसेना नेते तथा माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने घेतलेल्या मेळाव्यानंतर तानाजी सावंत यांनी तुळजापूरात ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष म्हणून निवडून दिला. आता मातेचा प्रसाद देण्याऐवजी येणाऱ्या भक्तांना ड्रग्जची एक पुडी दिली जाईल, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून पुजारी आक्रमक झाले असून त्यांनी तानाजी सावंतांविरोधात गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com