Maharashtra Live Update : बीड न्यायालयाचा आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेला दणका

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर....
satish Bhosle
satish BhosleSarkarnama

Ramdas Athawale News : काँग्रेसने हिंमत दाखवली नाही, पण मोदींनी क्रांतीकारक निर्णय घेतला : रामदास आठवले

राहुल गांधींसह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी जात निहाय जनगणना करण्याची मागणी केली होती. ती आता मान्य करण्यात आली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने जात निहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसवर टीका करताना, केंद्र सरकार ने घेतलेला निर्णय क्रांतिकारक असल्याचे म्हटलं आहे. तसेच काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात हा निर्णय घेण्याची हिंमत दाखवली नाही यामुळे आता राहुल गांधींनी टीका करू नये, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar News : जातनिहाय जनगणनेच्या निणर्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठक झाली. यावेळी महत्वाचे दोन निर्णय घेण्यात आले असून जातीय जनगणना आणि उसाच्या FRPत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे जाहीर आभार मानले आहेत. तसेच नरेंद्र मोदी सरकारचा जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा भविष्यात जातव्यवस्था संपूष्टात आणण्यास मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Union Cabinet News : मोदी सरकारकडून शिलाँग-सिलचर महामार्गाला मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठक झाली. या बैठकीत महत्वाचे दोन निर्णय घेण्यात आले असून मेघालय आणि आसामला जोडणाऱ्या शिलाँग-सिलचर महामार्गाला देखील मंजुरी देण्यात आली आहे. हा महामार्ग 166.8 किलोमीटर लांबीचा असून 22,864 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राने मंजुरी दिली आहे.

FRP News : पहलगाम हल्ल्यानंतर बैठकांचा सपाटा! मोंदींनी उस उत्पादकांसाठी घेतला मोठा निर्णय; FRPत 15 रूपयांची वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा झाली असून काही निर्णयही झाले आहेत. दरम्यान जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून FRPत 15 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. याबाबची माहिती सूचना आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Caste Census in India News : केंद्र सरकारने मोठा निर्णय! जगणननेसोबतच जानिहाय जनगणना होणार

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून देशभरात जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. ती मागणी केंद्र सरकारने मान्य केली असून जगणननेसोबतच जानिहाय जनगणना करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Gulabrao Patil News : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीला खिंडार, गुलाबराव पाटलांचा चिमटा

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खानदेशातील राजकारण तापले असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने येथे महाविकास आघाडीला खिंडार पाडले आहे. आजी-माजी मंत्री, बडे नेते अजितदादांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करत आहेत. यादरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी अहिराणी भाषेत गण म्हणत शुभेच्छा देताना टोला लगावला आहे. त्यांनी खानदेशात सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार गटात प्रवेशावर प्रतिक्रिया देताना, प्रवेश केला म्हणून त्यांचे लफडे बंद होईल असे नाहीये. ते कशा करता जाताहेत हे आख्या जगाला माहिती आहे, असा टोला लगावला आहे.

Beed Police : जामिनाचा अर्ज फेटाळत न्यायालयीन कोठडीमध्ये केली वाढ

आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले च्या विरोधामध्ये शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. सतीश उर्फ खोक्या भोसले ने बावी येथील ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीत सतीश भोसले न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा जमीन अर्ज फेटाळला आहे.

Devendra Fadnavis : अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधत पूजा करुन सपत्नीक 'गृहप्रवेश'

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण ते वर्षा बंगल्यावरच राहत होते. आता, देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन वर्षा बंगल्यावरील गृहप्रवेशाचे फोटो शेअर केले आहेत.

Sharad Pawar On Uddhav And Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली

ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकत्र येत असतील तर चांगलंच आहे. मात्र यासंबंधीचं भाष्य करण्याचा आजचा प्रसंग नाही, असं शरद पवार यांनी म्हटले आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आज आमदार जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेत ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदीर उभारण्यात आले. आज या तुळजाभवानी मंदिरात प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

Pahalgam Terror Attack : सर्जिकल स्ट्राईकपेक्षा भयंकर हल्ल्याची तयारी! निवृत्त मेजर जनरल यांचं मोठं भाकीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह तसेच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेत लष्कराला फ्री हँड दिला. तसेच लष्कराच्या तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठिशी असल्याचं स्पष्ट केलं. पहलगाम हल्ल्यावर दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य जे काही करेल, ते भयावह असेल आणि कदाचित पाकिस्तानची शकले पडतील. आधीच्या सर्जिकल आणि एअर स्ट्राइक मध्ये "एलिमेंट ऑफ सरप्राईज" होता. मात्र आता पाकिस्तानविरुद्ध आता जो होईल ते सर्जिकल व एयर स्ट्राइकच्या पुढचा असेल, म्हणजेच तो कदाचित अर्ध किंवा पूर्ण युद्ध अशा स्वरूपाचा असेल, अशी शक्यताही निवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांनी व्यक्त केली.

Jayant Patil On Radhakrishna Vikhe : 'नक्की काय प्रकरण आहे ते बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणे हे योग्य नाही'

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने 2004 ते 2010 या कार्यकाळामध्ये बनावट कागदपत्रे करून काढलेल्या बेसल डोस कर्जाच्या प्रकरणात भाजप मंत्री राधाकृष्ण विखेंसह 54 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. नक्की काय प्रकरण आहे ते बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणे हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

Jayant Patil On Pahalgam Attack : 'तीनशे किलोमीटर सरहद ओलांडून अतिरेक्यांनी पहलगामला हल्ला करणे, ही गंभीर बाब'

तीनशे किलोमीटर अतिरेकी काश्मीरला सरहद ओलांडून पहलगामला पोचले ही एक फार चिंतेची आणि गंभीर बाब आहे. आज ते सापडत नाही हा दुसरा गंभीर मुद्दा आहे. भारतावर हल्ला झाला आहे, निष्पाप लोकांवर हल्ला करून जो पळपुटेपणा, घाबरटपणा केलाय, त्याला सडेतोड उत्तर मोदी सरकारनं द्यावं, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar News : 'पहलगामची घटना हा देशावरचा हल्ला', विशेष अधिवेशन बोलवण्याची शरद पवारांची मागणी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करत 26 पर्यटकांची हत्या केली. यानंतर आजही संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अधिवेशन बोलवण्याची मागणी करताना यावर तेथेच बोलणं उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, पहलगाममधील हल्ला देशावरचा हल्ला असून धर्म, जात, पात भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. यामुळे देशवासीय कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यायला हवं असेही आवाहन केलं आहे.

Pahalgam Attack : भारतीय सैन्य दल पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देताना काही दिवसांत दिसेल

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या 'टेरर फॅक्टरी'ची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन भारतात घुसखोरी करताय, असं समोर आले आहे. दहशतवादी आणि पाकिस्तानी कमांडो हाशीम मुसा याआधी देखील काश्मीरमध्ये आला होता. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड हाशिम मुसा असल्याचं समोर येत आहे. त्याचा थेट पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयशीही काही संबंध आहे का याचाही शोध घेतला जात आहे.

Deven Bharti is the new Mumbai Police Commissioner : देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

मुंबईचे पोलिस आयुक्त फणसाळकर आज (बुधवारी) सेवेनिवृत्त झाले. त्यांच्या जागी देवेन भारती यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

बंगाली मुस्लिमांना कल्याण सोडण्याचा इशारा, शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल

कल्याण ग्रामीण मधील उसाटणे आणि खोणी गावालगत असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करत स्टोल्स टाकणाऱ्या बंगाली मुस्लिमांना मारहाण करत स्टोल्स तोडण्यात आले. तसेच पश्चिम बंगालमधील कोलकाताच्या मुस्लिमांना त्वरित गाव सोडण्याचा दिला इशारा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील यांनी दिला आहे. पाटील यांचा इशारा देत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पहलगाम हल्ल्याप्रकरणी गृहमंत्रालयावर कारवाई करा - संजय राऊत

जम्मू-कश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी ही गृहमंत्रालयाची होती. त्यामुळे या हल्ल्यात नुसत्या बैठकी घेऊन उपयोग नाही. आधी पाकिस्तावर हल्ला करा आणि कश्मीरमधील हल्ला रोखण्यास अपयशी ठरलेल्या गृहमंत्रालयावर कारवाई करा, अशी मागणी शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

येत्या 24 ते 36 तासांत भारतीय लष्कर पाकिस्तानवर हल्ला करणार - पाकिस्ताना मंत्र्याने व्यक्त केली भीती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तिन्ही लष्करप्रमुखांशी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीनंतर मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तानी माहिती आणि प्रसारण मंत्री अत्तातुल्लाह तरार यांनी पत्रकार परिषद घेत 24 ते 36 तासांत भारतीय लष्कर पाकिस्तावर हल्ला करणार असल्याची भीती व्यक्त केली. हल्लाबाबत आमच्याकडे विश्वसनीय माहिती असल्याचे त्यांनी म्हटले.

Kolkata Hotel Fire : कोलकातामधील हॉटेलला भीषण आग; 14 जणांचा होरपळून मृत्यू

मंगळवारी रात्री कोलकाता येथील फलपट्टी मच्छुआ भागातील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अग्निशमन दलाच्या मदतीने 22 जणांना वाचवण्यात आलं आहे. हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर बसवलेल्या वीज मीटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Pune News : पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग

पुण्यातील बी.जे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. या कॉलेजमध्ये दोन निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची माहिती आहे. दरम्यान, थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर कॉलेज प्रशासनाने मंगळवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे.

Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाचे महत्वाचे आदेश

परभणी येथील संविधान अवमान केल्याच्या घटनेनंतर उसळलेल्या दंगली प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यू प्रकरणात तपासी अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल पुढील सुनावणीपर्यंत अंतिम करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 8 मे रोजी होणार आहे.

Raosaheb Danve : रावसाहेब दानवे यांच्या कारला अपघात

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कारचा लोणावळ्यातील जयचंद चौकात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कामानिमित्त दानवे हे लोणावळ्यातील बाजारपेठेत आले असता, एक बाईकस्वाराने त्यांच्या कारला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.

Justice Bhushan Gavai : न्या. भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदावर नियुक्ती

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांची भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुढील मुख्य न्यायमूर्ती म्हणून गवई यांच्या नावाला परवानगी दिली. त्यानुसार आता ते 14 मे रोजी देशाचे पुढील न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतील.

Radhakrishna vikhe patil : राधाकृष्ण विखे पाटलांच्या अडचणी वाढल्या

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यासह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साखर कारखाना कर्जमाफी प्रकरणात 9 कोटींच्या अपहार प्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com