Rajmata Jijau Birth Anniversary: जिजाऊंचा जन्मोत्सव चार दिवसांवर; तरीही नियोजनाकडे दोन्ही पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Buldhana guardian minister Makarand Patil Rajmata Jijau Birth Anniversary: जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला देशभरातून लाखो भाविक हे सिंदखेडराजा येथे येत असतात मात्र त्यांच्यासाठी कुठल्याही सोयी सुविधा न पुरवता व कुठलीही आढावा बैठक न घेतल्याने आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.
Rajmata Jijau Birth Anniversary news
Rajmata Jijau Birth Anniversary newsSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News: राजमाता जिजाऊंच जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथे दरवर्षी 12 जानेवारीला जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. हा जन्मोत्सव आता चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. नियोजनाकडे दोन्ही पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी या ठिकाणी एकही आढावा बैठक घेतली नाही. सिंदखेड राजा येथे जिजाऊ भक्तांसाठी कुठल्याही सोयी सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे यांनी केला आहे.

बुलढाणा जिल्ह्याला दोन पालकमंत्री देण्यात आले आहेत. जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला देशभरातून लाखो भाविक हे सिंदखेडराजा येथे येत असतात मात्र त्यांच्यासाठी कुठल्याही सोयी सुविधा न पुरवता व कुठलीही आढावा बैठक न घेतल्याने आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. त्यांनी मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Rajmata Jijau Birth Anniversary news
Sharad Pawar News: निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार यांच्या माजी आमदाराला ह्दयविकाराचा झटका

येत्या 12 जानेवारीला सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातून लाखो भाविक येतात मात्र अद्यापही भाविकांसाठी कुठल्याही सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.

समृद्धी महामार्ग लगत राजमाता जिजाऊंचा बाल शिवबासह पुतळा उभा करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र अद्यापही तो पुतळा उभा न राहिल्याने मराठी क्रांती मोर्चा ने सरकारचा निषेध केला आहे. बुलढाण्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com