Voter Fraud Mumbai : दुबार मतदार सापडला, उमेदवारासमोरच सगळा खेळ; मनसे 'फोडाफोडी' करणार की, गप्प बसणार?

BMC Election: Duplicate Voter Found in Front of MNS Candidate Yashwant Killedar in Dadar : मुंबई महापालिका निवडणुकीत दादर इथं, मनसे उमेदवारासमोर दुबार मतदार सापडल्याने खळबळ उडाली आहे.
Voter Fraud Mumbai
Voter Fraud MumbaiSarkarnama
Published on
Updated on

BMC election controversy : दुबार मतदारांच चोख बंदोबस्त करा, दिसला की फोडा, असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरेंचा आहे. त्याखालोखाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील, यावर शिवसैनिकांना सतर्क राहाण्याचा आदेश दिला आहे.

दुबार मतदान, बोगस मतदान, रोखण्यासाठी मुंबईत 'भगवा गार्ड' तैनात आहेत. हे 'भगवा गार्ड' डोळ्यात तेल घालून उभा असल्याचे अनुभव येत आहे. यातच एक दुबार मतदार सापडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, 'मनसे'चे उमेदवारासमोर हा प्रकार उघडकीस आल्याने, राज ठाकरेंच्या आदेशानुसार हा दुबार मतदार 'फोडला की सोडला', याची चर्चा आहे.

मुंबई महापालिकेच्या (BMC Mumbai) 227 जागांसाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, मतदानाच्या पहिल्या तासांत दादरमधील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये 'दुबार मतदार' आढळला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार हे मतदान करण्यासाठी गेले असता, त्यांच्यासमोरच हा मतदार सापडला. त्यामुळे मतदान केंद्रावर असलेल्या सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली होती.

ठाकरे बंधूंनी एकत्र येत, मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मराठी मतदार, हा मुद्दा ठाकरे बंधूंनी उचलून धरला आहे. यासाठी मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी दुबार मतदार (Voter), बोगस मतदारांवर लक्ष ठेवा. विधानसभा निवडणुकीला ज्या चुका झाल्या, त्या टाळा, असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, दुबार मतदार दिसला तर त्याला तिथेच फोडून टाका," असे आक्रमक आदेश कार्यकर्त्यांना दिले होते.

Voter Fraud Mumbai
Voting Centre Facilities Issue : मतदान केंद्रावर गोंधळच गोंधळ! अडथळ्यांचा अनुभव सांगत इम्तियाज जलील संतापले; ‘सत्ताधारी एकमेकांना शिव्या देतात…’

याच पार्श्वभूमीवर मुंबई आज मतदानाच्या दिवशी मनसे कार्यकर्ते सतर्क असताना, यासाठी ठाकरे बंधूंच्या आदेशानुसार मुंबईत 'भगवा गार्ड' दिसत आहेत. दादर इथं वॉर्ड 192 मध्ये एक महिला मतदार दुबार यादीत असल्याचे समोर आले. यशवंत किल्लेदार स्वतः केंद्रावर उपस्थित असताना हा प्रकार घडला. संबंधित महिलेला तातडीने थांबवून तिची चौकशी करण्यात आली.

Voter Fraud Mumbai
Baramati Election: बारामतीत राष्ट्रवादीकडून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग; नेमका काय झाला फायदा?

मनसे कार्यकर्ते एकत्र येताच...

दुबार मतदार सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी दादरमधील मनसे सैनिकांना मिळाली. यानुसार अनेक मनसे सैनिकांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. त्यामुळे काहीसा गोंधळ सुरू झाला. मनसे सैनिक एकत्र येत असल्याचे पाहून, सुरक्षा यंत्रणा देखील अलर्ट झाली. या गोंधळानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली.

पारदर्शक निवडणूक कशी होणार?

संबंधित महिला मतदाराचे आधार कार्ड तपासून आणि त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेऊन त्यांना मतदानाची परवानगी देण्यात येणार आहे. हा सर्व प्रकार निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणामुळे घडला आहे. यादीत इतक्या मोठ्या चुका असतील, तर पारदर्शक निवडणूक कशी होणार?" असा सवाल मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com